Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Kigal Bridge exercise for women after childbirth

बाळंतपणानंतर महिलांसाठी फायदेशीर किगल ब्रिज व्यायाम 

दिव्य मराठी | Update - May 14, 2019, 12:10 AM IST

गर्भाशय, मूत्राशय आणि छोट्या आतड्यांना आधार देणाऱ्या स्नायूला किगल स्नायू म्हणतात. बाळंतपणानंतर शरीराचे किगल स्नायू अशक्त होतात.

 • Kigal Bridge exercise for women after childbirth

  गर्भाशय, मूत्राशय आणि छोट्या आतड्यांना आधार देणाऱ्या स्नायूला किगल स्नायू म्हणतात. बाळंतपणानंतर शरीराचे किगल स्नायू अशक्त होतात. याला मजबूत करण्यासाठी नियमितपणे किगल िब्रज व्यायाम केल्याने फायदा होतो.


  कसे करावे
  पाठीवर झाेपा आणि गुडघ्यांना वाकवा. तुमचे खांदे सरळ जमिनीला टेकवा. आता तुमच्या कमरेला आणि नितंबाला उचला आणि पेल्विक स्नायूला आत घ्या. या प्रकारे एका पुलासारखी पोझिशन होईल. नंतर ३-५ वेळा कंबर उचला आणि पेल्विकला सैल सोडून पुन्हा सुरुवातीच्या अवस्थेत या. असे ५ वेळा करा.


  पोट कमी करते
  यामुळे पोट कमी करण्यास मदत होते. तुम्ही याला िदवसातून २ ते ३ वेळा करू शकता. यामुळे तुमच्या पोटाचे स्नायू मजबूत होतील.


  युरिनची समस्या दूर होते
  बाळंतपणानंतर महिलांमध्ये युरिनची समस्या निर्माण होते. यापासून आराम मिळण्यासाठी या व्यायामाची मदत होते. हा दररोज केल्यास पेल्विक स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे सारखी सारखी येणाऱ्या युरिनची समस्येपासून आराम मिळतो.


  स्नायूंना आकार
  यामुळे पेल्विक स्नायू मूळ आकारात येण्यास मदत मिळते. बाळंतपणानंतर प्रजनन अंगाला मजबूत करण्यास हे लाभदायी आहे.


  ऊर्जा वाढवते
  या व्यायामामुळे शरीराची ऊर्जा वेगाने वाढते. यामुळे शरीराची चपळता वाढवण्यास मदत मिळते.


  लक्षात ठेवा
  बाळंतपणानंतर किगल व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण कित्येक प्रकारच्या शारीरिक हालचाली अशा आहेत ज्या तीन महिन्यांपर्यंत करू नये. नाही तर आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते.


  ही घ्या काळजी
  श्वास लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल तर हा व्यायाम करू नका. नाही तर त्रास वाढू शकतो.


  हे करण्यापूर्वी मूत्र विसर्जन करा. युरिनरी ब्लॅडर भरलेले असल्यामुळे पेल्विक एिरया अशक्त होतो आणि युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

Trending