आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या नवीन शोमधून कमबॅक करतोय कीकू शारदा, म्हणाला- असा दुसरा कपिल शर्मा यायला खूप वर्षे लागतील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा सुरू होणार आहे. या वेळेस कपिल शर्मा नवीन वस्ती आणि पात्रांसोबत पुनरागमन करत आहे. यात विनोदवीर कीकू शारदादेखील दिसेल. नुकतेच त्याच्याशी या शोविषयी आपल्या पात्राविषयही चर्चा करण्यात आली.

 

* कपिलच्या शोमधून पुनरागमन करून कसे वाटत आहे? 

- या शोच्या माध्यमातून पुनरागमन करून चांगले वाटत आहे. मला नेहमी विचारले जायचे, तुम्ही कधी परत येणार? कपिल शर्मासोबत पुन्हा परफॉर्म करणे आनंदाची गोष्ट आहे. मी आणखी जास्त चांगले काम करणार आहे. 

 

* कपिलसोबत तुझी केमिस्ट्री कशी आहे? 
- त्यांच्याबरोबर माझी केमिस्ट्री खूप चांगली आहे. मी त्यांचा खूप अादर करतो. विनोद आणि हजरजबाबीपणामध्ये त्याचा हात कुणी धरू शकत नाही. दुसरा कपिल शर्मा येण्यात बरीच वर्षे लागतील. त्यांच्याकडून बरेच काही शिकलो.

 

* या सिझनकडून प्रेक्षकांच्या काय अपेक्षा असतील? 

- प्रत्येक सिझनप्रमाणे या सिझनकडूनही प्रेक्षकांना जास्तीत जास्त मनोरंजनाची अपेक्षा असेल. ती पहिल्यापासूनच आहे. मी कुणालाही येथे खोटं सांगणार नाही, मात्र या वेळेस खूप काही नवीन गोष्टी करण्यात आल्या आहेत. कृष्णा आणि भारती आमच्यासोबत आहेत. 

 

* शाेमध्ये कोणते पात्र साकारणार आहेस? 
- मी या वेळेस दोन पात्रे साकारत आहे. एक बच्चा यादवचे. हे पात्र गेल्या शोमधील आहे. शिवाय मी यात एका महिलेचे तिजारी देवीचे पात्र साकारणार आहे. ती बच्चा यादवची आई असते. हे पात्र शेवटी दाखवले जाईल. अजून आम्ही याचे शूटिंग केले नाही. 

 

* तुझे पात्र कसे तयार झाले? 
- बच्चा यादव आता श्रीमंत झाला आहे. दूध विकून त्याने खूप पैसा कमावल्याचे तो म्हणतो. कपिल ज्या जागेवर काम करतो ती जागा बच्चा यादवची आहे. तो आजही जोक ऐकवतो. 

 

* भारती तुझी पत्नी बनली आहे, तिच्यासोबत कामाचा अनुभव कसा आहे ? 
- भारती खूपच प्रतिभावंत आहे. तिच्यासोबत पुरस्कार सोहळ्यात काम केले आहे. तिच्यासोबत काम करायला चांगले वाटते. ती खूप दिवसांपासून काम करत आहे. आम्ही एकमेकांवर पंच करतो तेव्हा तीदेखील चांगले पंच देते. स्वत:वर विनोद करायला ती नेहमी तयार असते. 

बातम्या आणखी आहेत...