आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील शहीद इन्सपॅक्टर इम्तियाज मीरच्या कुटुंबीयांनी फेसबूकवर लिहिले, दहशतवाद्यांनो या आम्हालाही मारून टाका..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुलवामा - दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेला जम्मू-काश्मीर पोलिसांचा अधिकारी इम्तियाज अहमद मीरच्या कुटुंबातील एका सदस्याने सोमवारी फेसबूकवर एक भावूक पोस्ट केली. दहशतवाद्यांना उद्देशून लिहिलेल्या या पोस्टमध्ये इम्तियाजच्या नातेवाईकांनी लिहिले, तुम्ही एका अशा व्यक्तीला मारले ज्याचे काश्मीरवर प्रेम होते. या आणि आम्हालाही मारून टाका. 


तो विचारांनी संत होता.. 
इम्तियाजच्या फेसबूक पेजवर लिहिलेल्या पोस्टचा मथळा, उपनिरीक्षक मीर इम्तियाजच्या मारेकऱ्यांना खुले पत्र असे आहे. त्यात लिहिले आहे, तुम्ही म्हाताऱ्या आईच्या लाडक्या आणि वडिलांच्या आज्ञाधारक मुलाची हत्या केली. तुम्ही अशा भावाला मारले जो, भाऊ, बहिणींचा एकमेव सहारा होता. तुम्ही एका असा मुलीच्या स्वप्नांची हत्या केली जिला त्याच्याशी लग्न करायचे होते. तुम्ही अशा व्यक्तीला मारले जो विचारांनी संत होता. तो सुफीवाद वाचायचा. तसेच कार्ल मार्क्स आणि प्रत्येच विचारधारेबद्दल वाचत होता. त्याची एकमेव इच्छा आनंददायी काश्मीर पाहणे ही होती. या पोस्टमध्ये लिहिले आहे, तुम्ही त्याला मारले पण मग आम्हाला का नाही मारले. तुम्ही त्याच्या आई-वडील, बहीण, भाऊ आणि त्या महिलेला का मारले नाही, जिला त्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्य घालवायचे होते. या आणि आम्हाला मारा. 


आई वडिलांना भेटण्यासाठी कापली होती दाढी 
जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सीआयडीचे सब इन्सपेक्टर इम्तियाज अहमद मीर (30) ला ठार केले. इम्तियाज सुट्टी घेऊन आई वडिलांना भेटण्यासाठी घरी जात होते. दहशतवाद्यांना त्यांना ओळखता येऊ नये म्हणून त्यांनी दाढी कापली होती. पण तरीही ते वाचू शकले नाहीत. इम्तियाजच्या सहकाऱ्यांनीच ही माहिती दिली. मीर यांना इशारा देण्यात आला होता की, घरी जाताना दहशतवादी त्यांच्यावर हल्ला करू शकतात. इम्तियाज 2010 बॅचचे सब-इन्स्पेक्टर होते. त्यांचे वडीलही पोलिसांत होते. ते पाच वर्षे गांदेरबलमध्ये होते. गेल्यावर्षी त्यांची बदली कुलगाम जिल्ह्यात झाली होती. याचवर्षी मार्च महिन्यात त्यांनी सीआयडीमध्ये तैनात करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...