आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर 50 देशांच्या बहुमताने बदलली किलोग्रॅमची व्याख्या, जाणून घ्या रोजच्या जीवनावर काय होणार परिणाम?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्रान्सच्या वर्सेल्समध्ये किलोग्रामची व्याख्या बदलली आहे. 50 पेक्षा जास्त देशांच्या संमतीनंतर, हा निर्णय घोषित करण्यात आला आहे. नवीन किलोग्राम 2019 पर्यंत येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नवीन किलोग्राम इलेक्ट्रॉन पंपच्या मदतीने मोजले जाणार आहे. हे किलोग्राम प्रवाहित विद्युतापासून सरासरी निर्माण करतो आणि विद्युताची गणना करतो. 1889 मध्ये पहिल्यांदाच एक किलोग्रामचा जागतिक स्तर ठरवला गेला होता. 19 व्या शतकात फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय ब्युरो ऑफ वेट्स आणि मेजर्स (बीआयपीएम) च्या कार्यालयात एका ग्लासमध्ये प्लॅटिनम इरिडिअम धातूचा एक तुकडा ठेवण्यात आला होता. त्याचा आकार सिलेंडरसारखा आहे.

 

सर्व शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे घेतला निर्णय 
या सिलेंडरचे वजन किलोग्राम इतके आहे. फ्रान्समधील वर्सेल्स येथे शुक्रवारी एक परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये, 50 हून अधिक देशांतील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. या परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी किलोग्रामची परिभाषा बदलण्यासाठी मतदान केले. यानंतर सर्वांच्या संमंतीने एका निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. किलोग्रामचे यांत्रिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जेने मोजमाप करावे असे अनेक शास्त्रज्ञांना वाटते. किलोग्रामध्ये झालेल्या बदलाचा लोकांच्या सामान्य जीवनावर काहीच परिणाम होणार नाही. जेथे एक मायक्रोग्रॅमचे (1ग्रॅमचा 10 लाखवा भाग) वजन महत्त्वाचे असेल अशा ठिकाणी हे परिमाण खूप उपयोगी ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त यंत्रणेतील 7 एककांपैकी किलोग्राम हे एक एकक आहे. किलोग्राममध्ये 90 % प्लॅटिनम आणि 10% इरिडिअम आहे. 
 
किब्बल किंवा वॅट बॅलेंन्सने मोजले जाईल किलोग्रॅम
येत्या काही काळात किलोग्राम किब्बल किंवा वॅट बॅलेन्समध्ये मोजण्यात येईल. किब्बल एक असे उपकरण आहे जे आपल्याला विद्युत चुम्बकीय ऊर्जा वापरून अचूक गणना सांगेल. यानंतर कुणीही किलोग्रामची व्याख्या बदलू शकणार नाही आणि त्याला काहीच नुकसान पोहोचणार नाही. हे नवीन मापक जगभरातील शास्त्रज्ञांना अचूक माप प्रदान करेल. 

 

पुढे वाचा....

बातम्या आणखी आहेत...