आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एयरपोर्टवर बॉयफ्रेंडच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होती अॅक्ट्रेस, जेव्हा आली सीऑफ करण्याची वेळ तेव्हा पब्लिकमधेच केले Liplock, घटस्फोटानंतर आपल्यापेक्षा कमी वयाच्या अॅक्टरला करत आहे डेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : फिल्म 'मोहब्बतें' पासून प्रसिद्ध झालेली अॅक्ट्रेस किम शर्मा सध्या बॉलिवूड अॅक्टर हर्षवर्धन राणेला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वीच किम आणि हर्षवर्धनला मुंबई एयरपोर्टवर पहिले गेले होते. यादरम्यान किम बॉयफ्रेंड हर्षवर्धनच्या मागे लपण्याच्या प्रयत्न करत होती. कपलने थांबून मीडियाला एकत्र एकही पोज दिली नाही. मात्र जेव्हा सीऑफ करण्याची बारी आली तेव्हा किमने हर्षवर्धनला पब्लिकमधेच Liplock केले आणि दोघाणीचे हे लवी-डवी मूमेंट कॅमेऱ्यात कैद झाले. किम-हर्षवर्धन अनेक मुंबईत एखादया रेस्तरॉमध्ये तर कधी एखाद्या इवेंटमध्ये सोबत दिसतात. काही दिवसांपूर्वीच किम पती अली पुंजानीपासून वेगळी झाली आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर लगेचच किम शर्माचे नाव डिजायनर अर्जुन खन्नासोबत जोडले गेले होते. हर्षवर्धनला शेवटचे फिल्म 'पलटन' पहिले गेले होते. 

 

3 मुलांच्या पित्यासोबत केले होते अक्ट्रेसने लग्न... 
- 2010 मध्ये किम शर्माने केनियामध्ये राहणारे बिजनेसमॅन अली पुंजानीसोबत मोम्बासामध्ये लग्न केले होते. मात्र दोघांनी एप्रिल, 2017 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. अलीचे आधीच लग्न झालेलले होते आणि तो तीन मुलांचा पिता होता. आपल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन अली पुंजानीने किम शर्मासोबत लग्न केले होते. 
- यापूर्वी किम शर्मावर तिच्या एका मेडने तिला नौकरीवरून काढल्याचा आरोप केला होता. तिचा आरोप होता कि, काम व्यवस्थित ना करण्याचे कारण सांगत किमने तिला मारले आणि नोकरीवरून काढून टाकले. 
- अली पुंजानीपासून वेगळी झाल्यांनतर मीडियामध्ये अशा बातम्या आल्या होत्या की, किम शर्मा कंगाल झाली आहे. मात्र नंतर किमने ट्वीट करून अशा बातम्यांचे खंडन केले होते. 

 

क्रिकेटर युवराज सिंहसोबतही होते अफेयर... 
- किम शर्मा सर्वात अगोदर क्रिकेटर युवराज सिंहसोबतच्या अफेयरमुळे चर्चेत आली होती. दोघांचे नाते जवळजवळ 4 वर्ष चालले आणि मग 2007 मध्ये ब्रेकअप झाले. सांगितले जाते की, युवराजच्या आईला किम आवडत नव्हती, यामुळे हे नाते तुटले. युवीने आईचे ऐकून किमपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. नंतर एका इंटरव्यूमध्ये किम म्हणाली होती की, युवराज आणि तिच्यामध्ये अंडरस्टॅण्डिंग नव्हते. युवराजनंतर किमने स्पॅनिश बॉयफ्रेंड कॉर्लोस मार्टिनला डेट केले. दोघे लग्न करून मॅड्रिड शिफ्ट होणार होते पण काही कारणाने त्यांचा साखरपुडा मोडला. 

 

'मोहब्बतें' ने मिळाला होता पहिला ब्रेक... 
- जेव्हा किम जाहिरातीत काम करत होती तेव्हा आदित्य चोप्राच्या नजरेस ती पडली. तिला फिल्ममधे पहिला ब्रेक 'मोहब्बतें' (2000) ने मिळाला. तिने 'फिदा', 'तुमसे अच्छा कौन है', 'नहले पे दहला', 'खडगम', 'टॉम डिक एंड हैरी', 'मनी है तो हनी है', 'यकीन', 'छोड़ो ना यार', 'ताजमहल' आणि 'जिंदगी रॉक्स' अशा चित्रपटात काम केले. 

 

बातम्या आणखी आहेत...