आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाॅर्म्युला-1 : फेरारीच्या 39 वर्षीय किमी रायकाेनेने 113 रेसनंतर जिंकली यूएस ग्रांप्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाॅस्टिन - फेरारीच्या रेसर किमी रायकाेनेने नुकतीच अमेरिकन अाेपन फाॅर्म्युला वनची ट्रॉफी पटकावली. त्याने हा किताब तब्बल ११३ रेसनंतर जिंकला. यानंतरचे त्याचे हे पहिले विजेतेपद ठरले. यामुळे त्याच्या नावे एफ वनच्या इतिहासामध्ये सर्वाधिक रेसच्या अंतरानंतर किताब जिंकण्याचा विक्रमही नाेंद झाला.याशिवाय त्याने विक्रमात इटलीच्या रिकार्डाेला मागे टाकले. रिकार्डाेच्या नावे ९९ रेसनंतर ट्राॅफी जिंकण्याचा विक्रम नाेंद हाेता. अाता यामध्ये रायकाेनेने बाजी मारली. त्याने १९८३ मध्ये अाफ्रिकन ग्रांप्री पटकावली हाेती. त्यानंतर त्याला १९९० मध्ये सॅन मॅरिनाेचा किताब पटकावला. 


२०१३ नंतर चॅम्पियन : फेरारीच्या किमी रायकाेनेला पाच वर्षांनंतर एफ-वनमध्ये चॅम्पियन हाेण्याचा बहुमान मिळाला. त्याने शेवटची ट्राॅफी २०१३ मध्ये जिंकली हाेती. 


लुईस हॅमिल्टनलाही मागे टाकले 
फेरारीच्या किमी रायकाेनेने ही ३०४.४०५ किमीची रेस एक तास ३४ मिनिटे १८.६४३ सेकंदांत पूर्ण केली. यादरम्यान त्याने रेडबुलच्या वर्सटापेन अाणि मर्सिडीझच्या लुईस हॅमिल्टनलाही मागे टाकले. यामुळे त्याला हा किताब अापल्या नावे करता अाला. हे दाेघेही अनुक्रमे दुसऱ्या अाणि तिसऱ्या स्थानावर राहिले. 


पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याची वेटलला संधी; यासाठी अाता अाहे ८ गुणांची गरज 
हॅमिल्टनला अाता पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याची संधी अाहे. यासाठी त्याला अाठ गुणांची गरज अाहे. अाता ताे पुढच्या अाठवड्यात हा बहुमान मिळवू शकेल. ताे मेक्सिकन ग्रांप्रीमध्येे सहभागी हाेणार अाहे. यातील किताबाने त्याला वर्ल्ड चॅम्पियन हाेता येईल. 


ड्रायव्हर्स स्टँडिंग : (टाॅप-५) 
रेसर       टीम        गुण 
हॅमिल्टन   मर्सिडीझ     ३४६ 
वेटल      फेरारी       २७६ 
रायकाेनेन फेरारी       २२१ 
बाेटास   मर्सिडीझ      २१७ 
वर्सटापेन   रेडबुल       १९१ 


टीम स्टँडिंग : (टाॅप-५) 
टीम      गुण 
मर्सिडीझ   ५६३ 
फेरारी     ४९७ 
रेडबुल     ३३७ 
रेनाॅल्ट   १०६ 
हास       ८४ 

बातम्या आणखी आहेत...