आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्याची निंदा करताना त्याच्या वाईट कर्माचे दोषही आपल्याला लागतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक राजा ब्राह्मणांना आपल्या महालाच्या अंगणात अन्नदान करत होता. राजाच्या स्वयंपाकी अंगणातच आकाशाखाली स्वयंपाक बनवत होता. त्याचवेळी एक घार जिवंत साप पकडून तेथूनच राजाच्या महालावरून उडत जात होती. तेवढ्यात सापाने स्वतःच्या रक्षणासाठी घारीवर विष फुत्कारले. ते विष ब्राह्मणांसाठी बनवण्यात येत असलेल्या स्वयंपाकात पडले. याविषयी कोणालाच काही समजले नाही. विषारी अन्न खाल्ल्यामुळे ब्राह्मणांचा मृत्यू झाला. राजाला याचे खूप दुःख झाले. या प्रकारामुळे यमदेवालाही एक गोष्टीचा निर्णय घेणे अवघड होऊन बसले की हे पापकर्म कोणाच्या खात्यामध्ये जाणार?


राजा - ज्याला माहितीच नव्हते की अन्न विषारी झाले आहे...की
स्वयंपाकी - ज्याला हेच माहिती नव्हते की स्वयंपाक करतानाच अन्न विषारी झाले आहे...की
ती घार - जी विषारी साप घेऊन राजाच्या महालावरून उडत गेली...की
तो साप - ज्याने स्वतःच्या रक्षणासाठी विष सोडले होते...


हे पाप कर्म कोणाच्या खात्यात लिहावे याचा निर्णय घेणे अवघड होऊन बसले होते. या घटनेनंतर काही ब्राह्मण राजाला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी एका महिलेला महालाचा रस्ता विचारला. महिलेने रस्ता तर सांगितला परंतु त्यासोबतच ब्राह्मणांना हेही सांगितले की- तो राजा तुमच्यासारख्या ब्राह्मणांच्या जेवणात विष टाकून त्यांना मारून टाकतो.


महिलेने हे शब्द उच्चारताच यमदेवाने त्या ब्राह्मणांच्या मृत्यूचे पाप या महिलेच्या खात्यात लिहिण्याचा निर्णय घेतला. यमदूताने याचे कारण विचारल्यानंतर यमदेव म्हणाले की- एखाद्या व्यक्तीने पाप केल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. परंतु त्या ब्राह्मणांच्या मृत्यूने राजाला, स्वयंपाकीला, सापाला आणि त्या घारीलाही आनंद झाला नाही. परंतु त्या पाप-कर्मविषयी वाईट बोलल्यामुळे त्या महिलेला नक्कीच आनंद झाला. यामुळे राजाच्या त्या नकळतपणे झालेल्या पाप-कर्माचे फळ आता या महिलेच्या खात्यात जाणार.


लाईफ मॅनेजमेंट
अनेकवेळा आपण असा विचार करतो की, आपण जीवनात कोणतेच पाप केले नाही तरीही आपल्या जीवनात एवढे दुःख कशामुळे? हे दुःख तुम्हाला इतरांमुळे नाही तर इतरांविषयी वाईट बोलल्यामुळे त्यांच्या पाप-कर्मातून येतात. अनेकवेळा लोक चुकून काही पाप करतात आणि लोक त्याविषयी अगदी मजेत एकमेकांशी चर्चा करतात. हीच त्यांची सर्वात मोठी चूक असते. यामुळे कधीही कोणाची निंदा करू नये.

बातम्या आणखी आहेत...