Home | Sports | Cricket | Off The Field | kings eleven punjab and rajsthan royals IPL match today

तिसरा पराभव टाळण्यासाठी पंजाबचे किंग्ज आज सज्ज!

वृत्तसंस्था | Update - Apr 16, 2019, 09:56 AM IST

राजस्थानला रोखण्यासाठी पंजाबला मोठी कसरत करावी लागेल.

 • kings eleven punjab and rajsthan royals IPL match today

  मोहाली - सलगच्या दोन पराभवांनी अडचणीत सापडलेला यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ विजयी ट्रॅकवर येण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी टीमचे खेळाडू घरच्या मैदानावर सरस खेळीसाठी सज्ज झाले आहेत. यातूनच यजमान पंजाबची नजर आता आयपीएलमधील आपला सलग तिसरा पराभव टाळण्यावर लागली आहे.

  यासाठी पंजाबच्या किंग्जला आपल्या घरच्या मैदानावर आज मंगळवारी राजस्थान रॉयल्सच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.मात्र, आपल्या घरच्या मैदानावर सरस खेळी करून विजयी पताका फडकावण्यासाठी यजमान पंजाबचा संघ उत्सुक आहे. यासाठी टीमने कसून सराव केला. कारण, गत सामन्यातील विजयाने राजस्थानचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे राजस्थानला रोखण्यासाठी पंजाबला मोठी कसरत करावी लागेल.


  पंजाबचा संघ आठ सामन्यांत आठ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ फॉर्मात आहे. या टीमने आपल्या होमग्राउंडवर गत सामन्यात तीन वेळच्या चॅम्पियन मुंबईचा फडशा पाडला. त्यामुळे या विजयाने राजस्थानच्या टीममधील खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. या सामन्यातील टीमची कामगिरी काैतुकास्पद ठरली. त्यामुळेच राजस्थानला या सामन्यात विजयाचा झेंडा उंचावता आला. त्यामुळे आता याच विजयाचा कित्ता गिरवण्याचा राजस्थानचा प्रयत्न असेल.


  मात्र, टीमचा कर्णधार अजिंक्य रहाणे सध्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याचा हा अपयशाचा सूर टीमसाठी धोकादायक ठरू शकतो. त्याने अनेक सामन्यांत टीमला चांगली सुरुवात करून दिली.


  मात्र, त्याला मोठी अशी खेळी अद्याप करता आली नाही. मात्र, टीममधील गाैतम आणि गोपाल हे दोघेही युवा गोलंदाज सरस खेळी करत आहेत. त्यामुळे त्याचा निश्चित मोठा फायदा टीमला होईल.

Trending