तीन बायकांचा राजा, दोन सुंदर पत्नींवर करायचा खुप प्रेम, अचानक झाला गंभीर आजार, तिसऱ्या बायकोने केले असे काही

राजा प्रेम करत नव्हता तरीसुद्धा ती राजावर खुप प्रेम करायची.

दिव्य मराठी वेब टीम

Apr 09,2019 12:01:00 AM IST


एका दंतकथेनुसार पुरातन काळात एका राजाला तीन बायका होत्या. त्यापैकी दोन खूप सुंदर होत्या त्यामुळे राजा त्या दोन बायकांवर खुप प्रेम करायचा, पण तिसरी दिसायला सुंदर नव्हती म्हणून तिच्याव प्रेम करत नव्हता. राजा प्रेम करत नव्हता तरीसुद्धा ती राजावर खुप प्रेम करायची.


काही दिवसानंतर राजाला गंभीर आजार झाला. राजाला बरे करण्यासाठी अनेक वैद्य बोलावले, पण सगळ्यांना अपयश येत होते. राजाला वाटले आता आपला मृत्यु जवळ आला आहे. राजाने त्याच्या दोन्ही प्रिय बायकांना म्हणाला मला एकट्याला मरण्याची इच्छा नाही, त्यामुळे तुम्ही दोघी माझ्यासोबत देवाघरी चला.


राजाचे बोलने ऐकुन त्याच्या दोन्ही पत्नी राजाला म्हणाल्या आम्ही दोघी आता जवान आहोत, सुंदर आहोत आम्हाला आताच मरायचे नाही. तुमच्या मृत्युनंतर आम्ही दुसऱ्या राजासोबत लग्न करू. हे ऐकुन राजाला खुप वाईट वाटले. तेव्हा राजाची तिसरी बायको तिथे आली आणि म्हणाली मी तुमच्या सोबत मरायला तयार आहे, कारण मी तुमच्या शिवाय राहू शकत नाही. राजा विचार करू लागला की ज्या पत्नीवर मी कधी प्रेम केले नाही, तिची काळजी घेतली नाही ती माझ्यासाठी जीवाची बाजी लावयला तयार झाली. ही माझ्यावर खरे प्रेम करते. राजाला आपली चुक कळाली आणि त्याने तिसऱ्या पत्निची माफी मागितली. त्यानंतर तिसऱ्या बायकोने राजाची खुप सेवा केली आणि हळू हळू राजा आजारातुन बरा झाला.

कथेची शिकवन :

या कथेची शिकवन एवढीच की आपण त्या व्यक्तीवर प्रेम करायला पाहीजे जो आपल्यावर प्रेम करतो, तेव्हाच आयुष्यात सुख-शांती मिळते. एकतर्फी प्रेमाचा शेवट हा नेहमीच वाईट असतो.


X
COMMENT