चुकूनही किन्नरांना दानामध्ये / चुकूनही किन्नरांना दानामध्ये देऊ नयेत या वस्तू, सुरु होऊ शकते पैशांची तंगी

मान्यतेनुसार किन्नर समुदायाला दान केल्याने सर्व अडचणी दूर होतात. यामुळे लोक किन्नरांना भरभरून दान देतात परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की, किन्नरांना प्रत्येक वस्तूचे दान केले जाऊ शकत नाही...

रिलिजन डेस्क

Dec 12,2018 12:04:00 AM IST

भारतामध्ये आजही किन्नर समुदायाचे लोक लग्नकार्य, जन्मोत्सव इ. शुभकार्यात आशीर्वाद देण्यासाठी सहभागी होताना दिसतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, किन्नर समुदाय केवळ शुभकार्यातच सहभागी का होतात? यामागचे कारण म्हणजे किन्नर स्वतःला मंगलमुखी मानतात. अर्थात, एखादे मंगलकार्य सुरु असतानाच ते येतात. किन्नरांच्या आशीर्वाद तुमचा वाईट काळ दूर करू शकतो. मान्यतेनुसार किन्नरांचा जन्म ब्रह्मदेवाच्या सावलीपासून झाला आहे, यामुळे किन्नरांचा अपमान ब्रह्मदेवाचा अपमान मानला जातो.


मान्यतेनुसार किन्नर समुदायाला दान केल्याने सर्व अडचणी दूर होतात. यामुळे लोक किन्नरांना भरभरून दान देतात परंतु तुम्हाला हे माहिती नसेल की, किन्नरांना प्रत्येक वस्तूचे दान केले जाऊ शकत नाही. काही वस्तू अशा आहेत, ज्या किन्नरांना चुकूनही दान करू नयेत. या वस्तूंचे दान केल्यास तुम्ही कायमचे दरिद्री होऊ शकता. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, किन्नरांना कोणत्या पाच वस्तू चुकूनही दान करू नयेत...

- किन्नरांना स्टीलचे भांडे चुकूनही दान करू नयेत. यामुळे घरातील सुख-शांती नष्ट होते.


- घरातील झाडूही किन्नरांना दान करू नये. झाडू दान केल्याने घरात पैसा टिकत नाही.


- किन्नरांना प्लास्टिक वस्तूही दान करू नयेत. यामुळे घराची प्रगती थांबते.


- घरातील जुने कपडेसुद्धा किन्नरांना दान करू नयेत. यामुळे बाधा निर्माण होतात.


- यासोबतच तेलाचे दानही किन्नरांना करू नये. यामुळे धन-धान्याची कमतरता राहते.

X
COMMENT