आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक घरातून येऊ लागला भयंकर वास, घरमालकाला कारण समजत नव्हते; अनेक खोल्या चेक केल्यावर एका खोलीत दिसला ड्रम..

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - कानपुरच्या घाटमपूरमधील साढ गावात एक किन्नर आपल्या प्रियकराची हत्या करून फरार झाला. घरातून येत असलेल्या भयंकर वासामुळे घरमालकाने जेव्हा रूम उघडून पाहिली तर त्याला धक्काच बसला. 

रूमच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या ड्रममध्ये किन्नरच्या प्रियकराचा मृतदेह होता. पोलिसांना कळवून त्याने ताबडतोब बोलावले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. पोलिस म्हणाले, मृतदेहाला 20 दिवस उलटून गेले आहेत. किन्नरचा शोध घेतला जात आहे.

 

घरातून येत होता भयंकर वास...
- घाटमपूर परिसरातील साढ गावात मोहम्मद जाकिर राहतात. ते म्हणाले, ''5 महिन्यांपूर्वी जाकिरने चांदनी किन्नरला रूम किरायाने दिली होती. ती तिचा प्रियकर वासिम (28) सोबत राहत होती.''

- ''चांदनी किन्नर ही मुलांचा जन्म आणि लग्नाच्या वरातीत नाचून पैसे मिळवायची. ती 20 दिवसांपूर्वी त्यांच्याकउे आली आणि म्हणाली की, तिचा प्रियकर वसीम बाहेर निघून गेला आहे, आता मीही रूम रिकामी करत आहे. ती रूमला कुलूप लावून किल्ली मला देऊन गेली.''

 

मृतदेहावर फिरत होत्या माशा अन् मुंग्या...
- घरमालक म्हणाले, ''सोमवारी जेव्हा रूममधून प्रचंड दुर्गंधी सुटली तेव्हा संशय आला. तोंडावर रूमाल बांधून अनेक खोल्या पाहिल्या, पण काहीच दिसले नाही. शेवटी चांदणीला रूममध्ये बंद करून दार उघडले. कोपऱ्यात प्लास्टिकचा एक ड्रम दिसला. ड्रममध्ये डोकावून पाहिले तर वासामुळे उलटी करत तिथून पळत बाहेर आलो. ओरडून शेजाऱ्यापाजाऱ्यांना गोळा केले, त्यांना पोलिसांना कळवायला सांगितले. ड्रमच्या वर फक्त वसीमचे पायच दिसत होते. मृतदेहाला मुंग्या लागल्या होत्या आणि माशा फिरत होत्या.

- ते म्हणाले की, वसीमचे डोके ड्रमच्या आत होते आणि पाय बाहेर निघत होते, पोलिसांनी किन्नरच्या रूममधून एक हत्यार हस्तगत केले आहे, त्यानेच हत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

वसीमला पती सांगायची किन्नर
- ते म्हणाले, चांदनीने वसीमला आपला पति सांगितले होते. तर वसीम स्वत:ला विवाहित सांगायचा. त्याला पत्नी आणि मुलेही आहेत. वसीम आठवड्याला किंवा पंधरा दिवसात एकदा किन्नरकडे यायचा. यामुळेच दोघांत नेहमी भांडण व्हायचे.

- चांदनी कुठली राहणारी होती, याची त्यांना माहिती नाही. चांदनीला वाटायचे की, वसीमने तिला सोडून कुठेच जाऊ नये. पण वसीम आपल्या कुटुंबाला भेटायला जात होता.

 

काय म्हणतात पोलिस?
- घाटमपूरचे इन्स्पेक्टर रवी श्रीवास्तव म्हणाले की, साढ गावात एका रूममध्ये ठेवलेल्या ड्रममधून तरुणाचा मृतदेह हस्तगत झाला आहे. घरमालकाने एका किन्नरला रूम किरायाने दिली होती. फॉरेंसिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तपास सुरू आहे. किन्नरचाही शोध घेतला जात आहे. मृतदेह जवळजवळ 20 दिवस जुना वाटत आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...