आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किपचोगेची 1:59:40 तासात 42.2 किमी रनिंग; मॅरेथाॅनच्या सीमा पार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएन्ना - या जगामध्ये मानवासाठी अशक्यप्राय असे काहीही नाही, हेच मला आता सिद्ध करायचे हाेते. खरे तरे व्यक्तीला काेणत्याही मर्यादा नाहीत. सर्व काही त्याच्या   आवाक्यात आहे. त्यामुळे विचार केलेल्या गाेष्टी आपण सहजपणे शक्य करू शकताे, ही क्षमता मानवामध्ये असल्याचे आता मला सर्वांसमाेर सिद्ध करता आले. त्यामुळे डाेक्यात आलेल्या विचारांना यशस्वी करता येते, हेही आता सर्वांच्या यशाचे गमक असेल, अशी प्रतिक्रिया विक्रमवीर आणि तीन वेळच्या आॅलिम्पिक पदक विजेत्या इलियुड किपचाेगेने दिली. त्याने शनिवारी ४२.२ किमीचे अंतर दाेन तासांपेक्षा कमी वेळात गाठण्याचा  पराक्रम केला आहे.

जागतिक स्तरावर मॅरेथाॅनच्या बाबतीत असलेल्या सर्व काही सीमारेषा किपचाेगेने पार केल्या. अशी अपुर्व कामगिरी करणारा किपचाेगे हा जगातील एकमेव धावपटू  ठरला. त्याने आॅस्ट्रियाच्या विएनामध्ये आयाेजित इनियाेस १.५९ चॅलेंजमध्ये १ तास ५९ मिनिट ४० सेकंदांत ४२.२ किमीची रनिंग पूर्ण केली. त्याने सरासरी प्रत्येक अडीच मिनिटाला एका किमीचे अंतर गाठले. मात्र, याची अधिकृत  नाेंद झाली नाही. 
 

अडथळे दूर करण्यासाठी पेसमेकर रनरचा आधार
धावपटूसाेबत एका वेळी ३ ते ५  पेसमेकर रनर धाव असात. हे रनर एयरोडायनमिक्स मॉडल म्हणून धावताना दिसतात. याचा अर्थ असा की, विक्रमी धाव घेण्याच्या प्रक्रीयेत धावपटूला  अडथळा येऊन नये, हे काम पेसमेकर करतात. यात समाेरून येणाऱ्या हवेसह इतर काही गाेष्टींचा समावेश आहे. त्यामुळे त्याची या वेळी शक्ती खर्च हाेत नाही.

४१ पेसमेकर आणि एका लेजर गायडिंग व्हॅनची किपचाेगेला मदत

> लेजर गायडिंग व्हॅन:  
रनर आणि पेसमेकर्सच्या समाेर एक व्हॅन धावत असते. ही व्हॅन रनिंग ट्रॅकच्या एका खास भागावर लेजर बीम करत असते. म्हणजे याच्याच आधारे रनर धावत असताे .हे सर्व संशाेधनात्मक अभ्यासातूनच लेजर बीम  त्या भागावर  टाकले जातात. हा ट्रॅकचा  सर्वात  स्मुथ असा भाग असताे. त्यामुळे धावपटूला फारसा थकवा येत नाही.
 

> पेसमेकर:  
असे रनर, ट्रॅकवर जे विश्वविक्रमासाठी धावत असलेल्या धावपटूला मदत करत असतात. या रेसच्या दरम्यान ३ ते ५ पेसमेकर धावतत असतात. यात काही किमीच्या अंतरात बदल केला जाताे. हे सर्व पेसमेकर ट्रॅकवरूनच धावतात.