आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धवा, अजब तुझे सरकार! देशद्रोही आता देशभक्त झाले! किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अस्लम शेख यांनी 2015 च्या अधिवेशनामध्ये आरोपी याकूब मेमनची फाशी रद्द करण्याची केली होती मागणी
  • याकूब मेमनचा फाशीला विरोध करणारे अस्लम शेखना 2015 मधे शिवसेना नी देशद्रोही सांगितले होते
  • तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून त्यास जोरदार विरोध दर्शवत, कामकाज बंद पाडले होते

मुंबई - सत्तास्थापनेच्या एक महिन्यानंतर सोमवारी अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांना मंत्रिमंडळात देण्यात आले आहे. मात्र या मुद्द्यावरून विरोधी पक्षाने महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धवा, अजब तुझे सरकार! देशद्रोही आता देशभक्त झाले! असे म्हणत सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागले आहे.

सोमय्या यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते शिवसेनेवर टीका करताना दिसत आहेत. ''अस्लम शेख यांनी 2015 च्या अधिवेशनामध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याची फाशी रद्द करण्याची मागणी केली होती. तत्कालीन भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून त्यास जोरदार विरोध दर्शवत सहा वेळा अधिवेशनाचे कामकाज बंद पाडले होते. त्यावेळी अस्लम शेखला देशद्रोही ठरवण्यात आले होते. आता तेच अस्लम शेख उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री झालेत. हे अजबच आहे,'' असे सोमय्या म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...