आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kisan Kranti Padyatra Stopped On UP Delhi Border Protesters Broke The Barricades

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य, शेतकरी म्हणाले दीडपट हमीभावाबाबत समाधानी नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या सीमेवर सकाळपासून झालेल्या घमासानानंतर अखेर सरकारने नमते घेतले आणि शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. शेतकऱ्यांच्या समस्या जीएसटी काऊन्सिलसमोर मांडण्याचा निर्णयही घेण्यात आला. कृषि राज्यमंत्री गजेंद्र शेखावत, ऊस मंत्री सुरेश राणा आणि मंत्री लक्ष्मिकांत चौधरी यांनी शेतकरी नेत्यांची भेट घेऊन मध्यस्थी केली. शेतकऱ्यांनी सुरुवातीला विरोध केला पण नंतर समजावल्यानंतर ते त्यांचे म्हणणे ऐकूण घ्यायला तयार झाले. 

 

भारतीय किसान संघाचे प्रवक्ते युधवीर सिंग म्हणाले, आमची सरकारबरोबर 11 मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यापैकी 7 मुद्द्यांवर सरकार सहमत आहे. 4 मुद्द्यांवर अद्याप सरकारने सहमती दाखवलेली नाही. त्यात सर्वात महत्त्वाच्या दीडपट हमीभावाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय दिलेला नसल्याने शेतकरी समाधानी नसल्याचेही ते म्हणाले. 

 

त्याआधी सकाळीच भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीजवळ पोहोचले. हरिव्दारहून निघालेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशाची परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही शेतकरी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेट्सवर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर चढवले. त्यानंतर शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा केला जात आहे. पोलिसांनी दिल्ली-युपी बॉर्डर सील केली असून मोठ्या संख्येने सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली. खबरदारी म्हणून पूर्व दिल्लीमध्ये कलम-144 लागू करण्यात आले आहे. 

 

#WATCH Visuals from UP-Delhi border where farmers have been stopped during 'Kisan Kranti Padyatra'. Police use water cannons to disperse protesters after protesters broke the barricades pic.twitter.com/9KUwKgvrwW

— ANI (@ANI) October 2, 2018

 

UPDATED

- शेतकऱ्यांच्या दगडफेकीला पोलिसांकडून सौम्य लाठीमाराने प्रत्युत्तर

- शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक

- जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांच्या वापर

- पोलिसांकडून शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पाण्याचा मारा 

- शेतकऱ्यांनी बॅरीकेट्सवलर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.

- दिल्लीच्या सीमेवर पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न, मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षक तैनात, ठिकठिकाणी बॅरीकेट्स लावले. 

 

कर्जमाफी आणि वीज बिलाचे दर कमी करण्याच्या मागण्यांसाठी 23 सप्टेंबरला हरिद्वारमधून किसान क्रांती पदयात्रा सुरू झाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर आणि मेरठ जिल्यांच्या मार्गे काल ही पदयात्रा गाझियाबादपर्यंत पोहोचली होती. त्याठिकाणी या शेतकऱ्यांना अडवण्यात आले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने राजघाट ते संसद असा मार्च काढण्याची या शेतकऱ्यांची इच्छा होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांनी बॅरीकेटींग केले असून दिल्लीकडे जाणारे सर्व मार्ग सील केले आहेत. 

 

आदित्यनाथ यांच्याशी चर्चा अपयशी 
हरिद्वारहून दिल्लीला जाण्यासाठी किसान क्रांती पदयात्रा सोमवारी उत्तरप्रदेशच्या साहिबाबाद येथे पोहोचली होती. त्यांनी दिल्लीकडे कूच केले. जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण शेतकरी त्यांच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हिंडन एअरपोर्टवर भेट घेतली. त्यांच्यात दोन तास चर्चा झाली, पण ही चर्चा अपयशी ठरली.