20 वर्षांनी लहान / 20 वर्षांनी लहान अॅक्ट्रेसवर जडला होता किशोरदांचा जीव, केले होते चौथे लग्न

Aug 04,2018 12:00:00 AM IST

मुंबई - हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील महान गायक किशोर कुमार आज आपल्यात असते तर त्यांनी 89 वा वाढदिवस साजरा केला असता. 4 ऑगस्ट 1929 ला मध्य प्रदेशातील खंडवामध्ये जन्मलेल्या किशोर कुमार यांनी वेगवेगळ्या भाषेत 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या पर्सनल लाईफबाबत बोलायचे तर तेही चर्चेचा विषय ठरले आहे.

20 वर्षे छोट्या अॅक्ट्रेसवर जडला जीव
- किशोरदा चार भावंडांमध्ये (अशोक, सती देवी, अनुप कुमार आणि किशोर कुमार) सर्वात छोटे होते.
- तीन लग्नांनंतर किशोर कुमार यांनी 51 व्या वर्षी 20 वर्षांनी लहान असलेल्या अॅक्ट्रेस लीना चंदावरकरबरोबर लग्न केले होते.
- दोघांचे वैवाहिक आयुष्य चांगले सुरू होते, पण 1987 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
- किशोर कुमारला अमित कुमार (पहली पत्नी रूमापासून ) आणि सुमित कुमार (लीना चंद्रावरकरपासून) ही दोन मुले आहेत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, किशोर यांच्यासाठी लीना यांनी पत्करला कुटुंबीयांचा विरोध..

कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन केले किशोरदांशी लग्न - लीना आणि किशोर कुमार यांनी प्यार अजनबी है मध्ये काम केले. - त्याचवेळी त्यांच्यात प्रेमाची सुरुवात झाली. लीना पहिल्या पतीच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर यायला लागली होती. - दोघे एकमेकांना पसंत करू लागले होते. लीनाने वडिलांकडे किशोर कुमार यांच्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. - लीना यांचे वडील या लग्नासाठी तयार नव्हते. कारण किशोन लीना यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे होते आणि आधीच त्यांचे लग्नही झालेले होते. - पण लीना यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन 1980 मध्ये किशोर कुमार यांच्याशी लग्न केले होते. - दोघांना एक मुलगा सुमीतही होता. पण सुमीत 5 वर्षांचा असताना किशोर कुमार यांचा मृत्यू झाला होता. - लीना पुन्हा एकट्या पडल्या. त्यानंतर त्या किशोर यांची पहिली पत्नी रूमा गुहा आणि त्यांचा मुलगा सुनेबरोबर राहू लागल्या.पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर लोक म्हणू लागले होते मांगलिक - महेबूब की मेहंदीमध्ये लीनाने राजेश खन्नाबरोबर काम केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. लीना यांचा बिदाई हा सर्वात गाजलेला चित्रपट होता. - त्यानंतरच लीना यांनी सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न करत चित्रपटसृष्टीपासून दुरावा घेतला होता. - लग्नाच्या काही दिवसांनंतरच लीना यांचे पती सिद्धार्थ यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. त्यावेळी लीना 25 वर्षांच्या होत्या. - लीना यांना चित्रपटात परतण्याची इच्छा नव्हती. सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर त्या एकट्या पडल्या होत्या. लोक तर त्यांना मांगलिकही म्हणायला लागले होते. - लीना कोणत्याही नातेवाईकाच्या घरी जात नव्हत्या. त्या आत्महत्या करण्याचाही विचार करू लागल्या होत्या.कुटुंबीयांच्या लपून टॅलेंट हंटमध्ये भाग घ्यायच्या लीना - लीना 15 वर्षांच्या होत्या, त्यावेळी त्यांनी हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहिले होते. लीना यांनी लपून टॅलेंट हंटसाठी अप्लाय केले. - एका स्पर्धेच्या माध्यमातून लीना बॉलिवूडमध्ये आल्या होत्या. पण लीना या स्पर्धेत विजेत्या नव्हे रनर अप बनल्या होत्या. - लीनाचे कुटुंबीय याच्या विरोधात होते. पण आजोबांनी साथ दिली. हिरोईनच्या रोलसाठी त्या फोर छोट्या होत्या, त्यामुळे त्यांना लहान बहिणीच्या भूमिका मिळत होत्या. - मेहबूब की मेहंदीमध्ये राजेश खन्नाबरोबरच्या रोमान्समुळे त्या चर्चेत आल्या होत्या.सुनील दत्तची नजर गेली.. - लीना चित्रपटांशिवाय काही जाहिरातीतही काम करायच्या. त्यावेळी अॅक्टर आणि फिल्ममेकर सुनील दत्त यांची नजर लीना यांच्यावर पडली. - सुनील दत्त त्यांचा भाऊ सोम दत्त साठी चित्रपट बनवत होते. 1969 मध्ये आलेल्या मन का मीतमध्ये लीना यांना मुख्य भूमिका मिळाली. त्यातून विनोद खन्नानेही डेब्यू केला होता. सुनील दत्त यांच्या पत्नी नर्गिस यांनी लीना यांना अॅक्टींगचे धडे दिले होते. एका फोटोशूटसाठी लीना यांना स्विम सूट परिधान करायला सांगितले तेव्हा त्या घाबरल्या होत्या. - लीना यांनी स्विमसूट परिधान केला पण चेंजिंग रूममधून बाहेर येण्यास नकार दिला. कारण त्यांनी पायाला वॅक्सिंग केले नव्हते. - मन का मीत मध्ये लीना यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर लीना यांना अनेक चित्रपट मिळाले. जितेंद्रबरोबर त्यांनी हमजोली देखिल केला. लवकरच त्या स्टार बनल्या.किसमुळे आल्या चर्चेत - अनेक वर्षांनंतर 2015 मध्ये लीना चंदावरकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या. - एका कार्यक्रमात 91 वर्षांचे वकील राम जेठमलानी यांनी त्यांना सर्वांसमोर किस केले होते. - लीना आणि राम जेठमलानी यांच्या या किसची बरीच चर्चा झाली होती. सर्वच हा प्रकार पाहून थक्क झाले होते. - या इव्हेंटनंतर लीना पुन्हा कोणत्याही कार्यक्रमात दिसल्या नाहीत.
X