Home | Flashback | Kishore Kumar Birthday Special

​...जेव्हा सेटवर अर्धी मिशी आणि दाढीमध्ये आले, असे होते किशोर कुमार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 12:00 AM IST

किशोर कुमार असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना एका वाक्यात सांगणे कठिण आहे. त्यांचे नाव घेताच अनेक गोष्टी समोर येतात.

 • Kishore Kumar Birthday Special

  मुंबई: किशोर कुमार असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना एका वाक्यात सांगणे कठिण आहे. त्यांचे नाव घेताच अनेक गोष्टी समोर येतात. त्यांचा अनोख्या गोष्टी. त्यांचे अनेक किस्से आहेत, त्यातील सत्य किती आणि काल्पनिक किती हे माहित नाही. 4 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या लेखक दिलीप ठाकुर यांनी सांगितलेल्या त्यांच्या गोष्टी...


  एकदा किशोर दा त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी अर्धी दाढी आणि अर्धी मिशीमध्ये पोहोचले होते. दिग्दर्शकाने विचारले, की हे काय आहे? किशोर दा यांनी लगेच उत्तर दिले, 'निर्मात्यांनी मला अर्धेच पैसे दिले आहेत. म्हणून मी अर्धी दाढी आणि अर्धी मिशीमध्ये आलोय. जेव्हा ते पूर्ण पैसे देतील तेव्हाच मी पूर्ण दाढी आणि मिशीमध्ये येईल.'


  जेव्हा नाही उचलला दिग्दर्शकाचा फोन...
  दिग्दर्शक कालिदास यांच्या 'हाफ तिकीट' सिनेमाच्या सेटवर किशोर कुमार हे बराचवेळ पोहोचले नहाही. म्हणून कालिदास यांनी त्यांच्या घरी फोन लावला. वारंवार फोन करूनही त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते किशोर कुमार यांच्या घरी म्हणजेच गौरीकुंजमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले, की किशोर कुमार घरीच होते आणि त्यांचा फोनही चालू होता. तरीदेखील त्यांनी फोन का नाही उचलला? यावर किशोर दा त्यांच्या स्टाइलमध्ये म्हणाले, 'हा फोन येणारे कॉल उचलण्यासाठी नाहीये.'


  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या किशोर कुमार यांच्याशी संबंधित रंजक गोष्टी...

 • Kishore Kumar Birthday Special

  कधी केले बहाणे तर कधी केले फुकटात काम...


  कधी-कधी किशोर दा वेळेवर पैसे मिळाले नाही तर व्यवस्थित गात नव्हते. कधी त्यांनी 'डॉन' सिनेमातील 'खाइके पान बनारसवाला' गाण्यासाठी केवळ पान खाणे योग्य समजले. कधी संगीतकार बप्पी लहरी यांच्या आश्वासन घेतले, की 'बढती का नाम दाढी'मध्ये बप्पी अभिनय करतील आणि स्वत: किशोर कुमार त्यात गातील. कधी 'दुश्मन' सिनेमाच्या 'सच्चाई झुक नही सकती' गाण्याला आवाज शोभत नसल्याला बहाणा सांगून संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलालला नाही म्हटले. परंतु जेव्हा राकेश खन्ना निर्माता बनले तेव्हा त्यांच्या पहिला सिनेमात फुकटात गाणे गायले. 

   

 • Kishore Kumar Birthday Special

  छोट्या-छोट्या भूमिकांमधून केली करिअरची सुरुवात...


  मध्यप्रदेशातील छोटेशे शहर खंडवामध्ये जन्मलेल्या किशोर कुमारांचे खरे नाव आभास कुमार कुंजीलाल गांगुली आहे. ते अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनूप कुमार हे तिघे भाऊ आहेत. त्यांच्या बहिणीचे नाव सती राणी देवी आहे. वडील वकील होते. थोरला भाऊ अशोक कुमार बॉम्बे टॉकीजचा आधार होते. त्यांच्याच 'शिकारी' आणि 'तमन्ना'सारखे सिनेमांत छोटे-छोटे रोल करून किशोर यांनी अभिनयाची सुरुवात केली. कधी अभिनय करायचे तर कधी सिंगिंग, असेच त्यांचे करिअर पुढे गेले. सत्येन बोस दिग्दर्शित 'चलती का नाम गाडी'ने किशोर यांना कॉमेडी हिरोची इमेज आणि 'आराधना'च्या 'मेरे सपनो की रानी' आणि 'रुप तेरा मस्ताना'सारख्या गाण्यांनी त्यांच्या गायनाच्या करिअरला वेगळे स्थान मिळवून दिले. आतापर्यंत ते देवानंदच्या आवाजाच्या रुपात ओळखले जात होते. परंतु 'आराधना'नंतर ते राजेश खन्नाचे आवाज बनले. 

   

 • Kishore Kumar Birthday Special

  किशोर यांचा आवाज आणि सुपरस्टार राजेश खन्ना...


  राजेश खन्ना यांना सुपरस्टार बनण्यात किशोर कुमार यांच्या आवाजाची महत्वपूर्ण भूमिका आहे. सर्व टॉप संगीतकार आणि सर्व मोठ्या कलाकारांसाठी किशोर कुमार यांनी आवाज दिला आहे. सर्व प्रकारची गाणी गायली. 'मेरे नैना सावन भादो' (मेहबूबा) सारख्या शास्त्रीय संगीतावर आधारित गाणेसुद्धा उत्तम गायले. निर्माता-दिग्दर्शक म्हणून ओळख निर्माण केली. 'दूर गगन की छांव मे'सारखे गंभीर सिनेमे देण्यासोबतच 'बढती का नाम दाढी' आणि 'शाबाश डैडी'सारख्या कॉमेडी सिनेमांची निर्मिती केली. तसेच किशोर कुमार 'चलती का नाम जिंदगी', 'प्यार अजनबी है', 'ममता की छांव मे'सारख्या सामाजिक सिनेमांतसुध्दा रुची घेत होते. दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता, संगीतकार, गायक आणि डान्स डायरेक्टर, या सर्व जबाबदारी ते एकटे उचलत होते. 

   

 • Kishore Kumar Birthday Special

  पर्सनल लाइफ...


  किशोर कुमार यांचे वैवाहिक आयुष्य रंजक होते. कदाचितच असे कुणाचे असेल. रुमादेवीसोबत (रूमा गुहा ठाकुरता) त्यांचे वैवाहिक आयुष्य जास्त काळ टिकू शकले नाही. अमित कुमारला जन्म दिल्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. नंतर ते विभक्त झाले. मधुबालासोबत लग्न करून ते आनंदी होते, परंतु कॅन्सरमुळे तिचे निधन झाले. योगिता बालीसोबत काही दिवस संसार केला. योगिता मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडली आणि किशोर यांचे हेही लग्न मोडले. योगितासोबत लग्न तुटल्यानंतर लीना चंदावरकरसोबत त्यांनी चौथे लग्न केले. सुमित कुमार किशोर आणि लीना यांचाच मुलगा आहे. 13 ऑक्टोबर 1987ला किशोर कुमार यांचे निधन झाले. 
   

Trending