आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बॉस मराठी-2; मला नेहमी गोष्टी शांत राहून सोडवायला आवडतात- किशोरी शहाणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क- सध्या महाराष्ट्रात बिग बॉस मराठी 2 चे वारे वाहत आहेत. कार्यक्रमाचा शेवट जवळ आला आहे. आता या पर्वाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांणाच लागली आहे. शेवटच्या टप्यात आता फक्त 6 स्पर्धक उरले आहेत. यात शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणा, आरोह वेलणकर, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या सहाजणात 1 सप्टेंबरला अंतिम सामना रंगणार आहे. विजेत्याला ट्रॉफी आणि 25 लाखांचे बक्षीस मिळेल.
 
बिग बॉसच्या घरात रंगलेल्या पत्रकार परिषदेत सर्वच स्पर्धकांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी इतक्या दिवसानंतर बाहेरच्या व्यक्तींना पाहून सर्व स्पर्धक खूप खूश होते. यावेळी कित्येक दिवसानंतर मास्क न घातलेल्या लोकांना पाहतोय असे शिव म्हणाला तर अनेक दिवसानंतर पत्रकारांना भेटून खूप आनंद वाटल्याचे किशोरी शहाने यांनी सांगितले. किशोरी शहाणेंची तब्येत ठिक नसल्याने त्यांना बोलता येत नव्हते, तरीदेखील त्यांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
 
यावेळी अभिनेत्री किशोरी शहाणे यांना प्रश्न विचारण्यात आला की, घरा अनेक वाद झाले यावेळी, तुम्ही संपूर्ण पर्वात कधीच स्वतःचा स्टँड घेतला नाही. तुम्ही कधीही भांडला नाहीत. असे का?  त्याला उत्तर देताना किशोरी म्हणाल्या की, मी नेहमी गोष्टी सॉल्व करण्याचा प्रयत्न करते. माझा स्वभावच आहे तसा. मला राग येत नाही आणि रागात बोलू शकत नाही. मला साध्या पद्धतीने गोष्टी सोडवायला आवडतात. माझा प्रवास सुरळीत सुरू होता. मी सुरुवातील दबावात होते, पण नंतर मी शांत होऊन खेळू लागले आणि कोणाचेही न ऐकता मी खेळले आणि चांगली खेळत राहीले. असे स्पष्टीकरण किशोरी शहाणे यांनी दिले.