आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Kissing Scene Does Not Have Any Fun, But It Is A Lot Of Pressure Movement' Disha Patani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'किसिंग सीन करतांना काही मजा नाही येत, उलट तो तर खूप प्रेशर मोमेंट असतो' - दिशा पाटनी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : दिशा पाटनीचा आगामी चित्रपट ‘मलंग’ 7 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या दिशाने दैनिक भास्करसोबत बातचीत केली. तिने चित्रपटाशी निगडित अनेक सीन्स आणि आपल्या व्यस्त शेड्यूलबद्दल सांगितले. ‘मलंग’ चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर, अनिल कपूरदेखील मुख्य भूमिकेत आहेत.  

तू चित्रपटात बरेच बोल्ड आणि किसिंग सीन देते, त्यामुळे खूप ट्रोलिंगदेखील होते, मीम्स बनवले जातात, याचा तू कसा विचार करतेस ?
 
आता तर या सर्वांची सवय झाली आहे. सोशल मीडियावर तर सर्वांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आता मी याचा लोड घेत नाही, सवय झाली आहे. मीम्सबद्दल बोलायचे तर, तर असे नाहीये की, आम्ही मीम्स पाहात नाही, आम्ही मोबाइलवर ते पाहतो, जे हे मीम्स बनवतात ते कुणालातरी हसवत आहेत, मग यामध्ये वाईट काय आहे. चांगले आहे ना... आम्हालाही एन्जॉय करू द्या आणि त्यांनाही. 

किसिंग सीन करताना तू कोणत्या अभिनेत्यासोबत कंफर्टेबल राहिलीस ?

कुणासोबतच कंफर्टेबल नसते. लोकांना वाटते की, किसिंग करताना मजा येत असेल, पण असे नसते. जेव्हा तुम्ही असा सीन करत असता, तेव्हा तीन मोठे कॅमेरे तुमच्या आसपास लागलेले असतात. 50 लोक सेटवर असतात. जे तुम्हाला बारकाईने पाहत असतात. 10 लोक मॉनिटरमध्ये पाहात असतात. तर अशावेळी खूप प्रेशर असते. काही मजा नाहीये यामध्ये. 

स्वतःबद्दल केलेल्या चांगल्या कमेंटतर वाचताच असशील ?

नाही, मी कमेंट वाचणे सोडले आहे. 

तुमची फॅमिली तुमचे चित्रपट बघतात का आणि त्यांची याबद्दल काय प्रतिक्रिया असते ?

हो, सर्वच पाहतात. त्यांना आवडतातदेखील. पण ते यावर काहीही कमेंट करत नाहीत. निश्चितच त्यांची मुलगी आहे तर त्यांना माझे सर्वच चित्रपट आणि माझे काम आवडते. मी काही वाईट केले आहे का, याच्या डिटेलमध्ये ते जात नाहीत. 


एका मुलाखतीदरम्यान टायगर श्रॉफ म्हणाला होता की, तू साधी वाटायचीस पण तू तर गुंडी आहेस, आम्ही जाणून घेऊ इच्छितो तू साधी आहेस की, गुंडी
?

हे तर तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही मला साधी म्हणून पाहता की, गुंडी म्हणून. जेव्हा मी लहान होते तेव्हा मी टॉमबॉय टाइप होते. माझे केस छोटे असायचे. दहाव्या वर्गापर्यंत लोक मला जादू म्हणायचे. शाळेत माझी खिल्ली उडवली जायची. पण मी खेळात चांगली होते. स्टेट लेव्हलवर बास्केटबॉल खेळायचे. बाइक चालवायचे. या सर्व माझ्या आवडी होत्या, पण तरीही थोडी लाजाळू होते. अशी नव्हते की,  जाईन आणि कुणालाही मारून परत येईन. अशी माझी बहीण होती, जी पूर्ण गुंड होती. 

मग आता एवढा बदल कसा ?

मी अजूनही टॉमबॉयच आहे. लोकांमध्ये जेव्हा जायचे यायचे असेल किंवा मीडियाला भेटायचे असेल तेव्हा मी पूर्णपणे तयार होऊन जाते. आता मीडियासमोर किंवा लोकांसमोर तर बास्केटबॉल शॉर्ट्समध्ये येऊ शकत नाही ना..., पण खऱ्या आयुष्यात मी अजूनही ती बास्केटबॉलवाली बिनधास्त मुलगी आहे. 

‘मलंग’ चित्रपटात डायलॉग आहे की, मर्डर करण्यात मजा नहिये, रियल लाइफमध्ये दिशाला कोणत्या गोष्टीत जास्त मजा येते ?

मला खाण्यात मजा येते. डायटिंग शेड्यूलदरम्यान जे चीट मील डे मिळतात, ते खूप मजेशीर असतात. 
(जेव्हा दिशाला तिचा खास मित्र टायगर श्रॉफ आणि त्यांच्या मैत्रीबद्दल विचारले गेले तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, ती याच्याशी निगडित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.)

दिशाला शांतात केव्हा मिळते ?

जेव्हा काम करते. जेव्हा चित्रपटाचे कौतुक होते आणि तो पाहून प्रेक्षक पैसा वसूल म्हणतात तेव्हा आनंद मिळतो. याव्यतिरिक्त घरी पेट्स (मांजर-कुत्रा) सोबत असते तेव्हाही समाधानी असते. 

यावेळी येणार व्हॅलेन्टाईन डे कुणासोबत स्जकर करणार आहे ?

यादरम्यान सलमान खानचा चित्रपट 'राधे' च्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. 

मग काय तू यावेळी सलमान खानसोबत व्हॅलेन्टाईन डे साजरा करणार आहे ?

यापेक्षा छान काय असू शकते.