स्वयंपाक करताना या गोष्टी विसरू नका

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 01:47 PM IST

भोजन जेवढे रुचकर आणि पोषक तेवढे घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले, हे सूत्र विसरू नका.

  • kitchen-health

    निरोगी शरीरात निरोगी मन वसत असते. निरोगी शरीरासाठी पोषक अन्नाचे महत्त्व वादातीत आहे. भोजन जेवढे रुचकर आणि पोषक तेवढे घरातल्या लोकांचे आरोग्य चांगले, हे सूत्र विसरू नका.
    स्वयंपाक करणारी गृहिणी निरोगी राहिली तरच घर निरोगी राहील. किचनमध्ये स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड असणे गरजेचे आहे. स्वयंपाक करताना गृहिणीचे मुख उत्तर दिशेला होत असेल तर सव्र्हायकल स्पॉंडिलिटीस किंवा थायरॉईड संबंधी आजार उद्भवू शकतात. दक्षिणेकडे मुख करूनही स्वयंपाक करू नका. यामुळे गृहिणीच्या शरीर मनावर विपरित परिणाम होऊ शकतात. पश्चिमेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने डोळे, नाक, कान आणि घशाचे विकार उद्भवू शकतात.

Trending