आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • KK Menon To Play Dawood Ibrahim's Father In A Web Series Based On Dongri To Dubai

डोंगरी टू दुबईवर आधारित वेब सीरिजमध्ये दाऊद इब्राहिमच्या वडिलांच्या भूमिकेत केके मेनन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः हुसेन झैदीच्या डोंगरी ते दुबई या पुस्तकावरील वेब सिरीजमध्ये केके मेनन दाऊदचे वडील इब्राहिम कासकरची भूमिका साकरु शकतो. सध्या या मालिकेच्या कलाकारांसाठी कार्यशाळा सुरु असून येत्या महिन्यापासून त्याचे चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फरहान खान आणि रितेश सिधवानी यांनी केली आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांना या पात्रामध्ये नाजूकपणा जोडायचा होता, म्हणून ते केके मेननला कास्ट करण्याच्या विचारात आहेत. ही मालिका दहा भागात प्रसिद्ध होईल. 2007 साली अनुराग कश्यपच्या 'ब्लॅक फ्रायडे' चित्रपटात मेननने डीसीपी राकेश मारियाची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमधील प्रतिभावान कलाकारांपैकी एक असलेल्या मेननने 'हजारो ख्वाहिशें ऐसी', 'ब्लॅक फ्रायडे', 'हैदर' यासारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.


ही कथा 60 च्या दशकापासून ते 93 च्या दशकातील असून यासाठी मुंबईतील विशेषत: डोंगरी, फोर्ट,  मशिद बंदर रोड, बोरा बाजार या भागांना रिक्रिएट केले जाईल. सूत्रांनुसार, याचे बजेट बरेच आहे. अॅमेझॉन आणि एक्सेल एन्टरटेन्मेंटद्वारे ही वेब सीरिज बनविली जात आहे. त्यांच्या 'इनसाईड एज' आणि 'मिर्जापूर'पेक्षाही याचे बजेट जास्त आहे.

या वेब सीरिजमध्ये, मुंबई माफियांच्या बड्या नावांची म्हणजेच हाजी मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम, अबू सलेम, छोटा राजन वर्धर्जन मुदलीयार यांची माहिती देण्यात आली आहे. डोंगरी ते दुबई हे पत्रकार हुसेन जैदी यांचे पुस्तक आहे, ज्यात 6 दशकातील मुंबई माफियांचा उल्लेख आहे. पुस्तकात छोटे गुंड व तस्करांचा माफिया होण्याचा प्रवास सांगितला गेला आहे. सुमारे 408 पानांचे हे पुस्तक वर्ष 2012 मध्ये प्रकाशित झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...