IPL : कोलकाता नाइट रायडर्सची किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात

रॉबिन उथप्पा, नितीश राणा, डेव्हिड मिलरची शानदार अर्धशतके

वृत्तसंस्था

Mar 28,2019 10:21:00 AM IST

नवी दिल्ली - कोलकाता नाइट रायडर्स संघाने १२ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेत बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर २८ धावांनी मात केली.


प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने २० षटकांत ४ बाद २१८ धावांचा डोंगर उभारला. यात लिन (१०) व सुनील नरेन (२४) झटपट बाद झाले. रॉबिन उथप्पाने ५० चेंडूंत ६ चौकार व २ षटकार खेचत ६७ धावा ठोकल्या. एन. राणाने ३४ चेंडंूत २ चौकार व ७ षटकार लगावत ६३ धावा चोपल्या. आंद्रे रसेलने १७ चेंडंूत ४८ धावांचा पाऊस पाडला. पंजाबकडून मो. शमी, टाय यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


प्रत्युत्तरात किंग्ज इलेव्हन पंजाब निर्धारित २० षटकांत ४ बाद १९० धावा करू शकला. यात लोकेश राहुल अवघ्या एका धावेवर परतला. ख्रिस गेलदेखील १३ चेंडंूत २० धावा करून बाद झाला. मयंक अग्रवालने ३४ चेंडंूत ५८ धावा ठोकल्या. सरफराज खानने १३ व मनदीप सिंगने नाबाद ३३ धावा केल्या. डेव्हिड मिलरने नाबाद ५९ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. कोलकात्याच्या आंद्रे रसेलने २ आणि फर्ग्युसन व पीयूष चावलाने प्रत्येकी एक बळी घेतला.

X
COMMENT