Home | Sports | From The Field | KKR won continuously 4 times against RR

दाेन वेळच्या चॅम्प काेलकात्याची ४ वर्षांत राजस्थानवर सलग चाैथ्यांदा मात; राजस्थानच्या स्मिथचे अर्धशतक व्यर्थ

वृत्तसंस्था | Update - Apr 08, 2019, 08:53 AM IST

सुनील नरेनच्या ४७ धावा, लीनसाेबत केली ९१ धावांची भागीदारी

  • KKR won continuously 4 times against RR

    जयपूर - काेलकाता नाइट रायडर्स संघाने रविवारी १२ व्या सत्राच्या अायपीएलमध्ये विजयाचा चाैकार मारला. काेलकाता संघाने लीगमधील अापल्या पाचव्या सामन्यात यजमान राजस्थान राॅॅयल्सवर मात केली. काेलकाता संघाने १३.५ षटकात ८ गड्यांनी सामना जिंकला. यासह काेलकाता संघाने चार वर्षांत राजस्थान राॅयल्सवर सलग चाैथ्या विजयाची नाेंद केली. तसेच काेलकाता संघाचा लीगमधील हा चाैथा विजय ठरला. या विजयाच्या बळावर काेलकाता संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर दाखल झाला. राजस्थानचा हा लीगमधील चाैथा पराभव ठरला. रहाणेचा संघ घरच्या मैदानावर विजयासाठी प्रयत्नशील हाेता. मात्र, त्यांना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. यातून टीमचा पराभव झाला.

    प्रथम फलंदाजी करताना राजस्थान राॅयल्स संघाने घरच्या मैदानावर ३ बाद १३९ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात काेलकाता संघाने २ गड्यांच्या माेबदल्यात विजयश्री खेचून अाणली.सुनील नरेन (४७) अाणि क्रिस लीन (५०) यांनी झंझावाती खेळी करताना संघाला ९१ धावांच्या भागीदारीची सलामी िदली. यासह त्यांनी संघाच्या विजयाचा पाया रचला. दरम्यान, लीनने शानदार अर्धशतक साजरे केले. त्यानंतर राॅबिन उथप्पाने नाबाद २६ धावांची खेळी करून विजयश्री खेचून अाणली. यासाठी त्याला युवा फलंदाज शुभमान गिलची (नाबाद ६०) माेलाची साथ मिळाली.

Trending