आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण ओबेरॉय रेप केस प्रकरणाला आणखी एक वळण, तक्रारदारावर झाला चाकूने हल्ला, महिलेचा वकीलच निघाला मास्टरमाइंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : टीव्ही अभिनेता करण ओबेरॉयच्या केसमध्ये प्रत्येक दिवशी नवीन वळण येत आहे. शुक्रवारी ही बातमी समोर आली होती की, करणवर रेप केस दाखल करणारी महिला ज्योतिषी 25 मेला जेव्हा मॉर्निंग वॉकवर निघाली तेव्हा चार लोकांनी चाकूने तिच्यावर हल्ला केला. मात्र प्रकरणाचा तपस करत असलेल्या पोलिसांनी सांगितले, यासाठी पुरेसे पुरावे नाहीत की, हल्ल्याचा संबंध करण ओबेरॉय रेप केसशी निगडित आहे. पण या प्रकरणी आलेला ताजा ट्विस्ट हैराण करणारा आहे.  

 

तक्रारदाराच्या वकीलाने करायला लावला हल्ला... 
रिपोर्ट्समध्ये पोलीस सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे, महिला ज्योतिषीवर हल्ला तिचा वकील अली कासिफ खानच्या इशाऱ्यावर केला गेला होता. रिपोर्ट्सनुसार, "पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्ल्यानंतर गुरुवारी चार युवकांना अटक केली गेली. यातील एकाने जेव्हापासून हा खुलासा केला आहे की, हल्ल्याचा मास्टरमाइंड वकील आहे, तेव्हापासून त्याचा शोध सुरु आहे. शुक्रवारी वकीलाने कोणत्याच कॉलला उत्तर दिले नाही. त्याचा मोबाइल बंद येत होता. 

 

अटक झालेल्या चारही युवकांमध्ये एक आहे वकीलाचा नातेवाईक... 
अटक केलेल्या चारही युवकांची ओळख, जीशान अहमद (23) आणि अल्तमश अहमद (22), जितिन संतोष कुरियन (22) आणि अराफत अहमद अली (21) च्या रूपामध्ये झाली आहे. हे चारही स्टुडंट्स आहेत. अराफत अहमद अली वकील अली कासिफ खानचा दूरच नातेवाईक आहे. त्याचे म्हणणे आहे की, खानने त्याला आपल्या क्लायेंटवर हल्ला आणि पैशांसाठी धमकावण्याचे काम सोपवले होते. 

 

हालयामागचा उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही... 
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्यामागचा उद्देश्य अजूनही स्पष्ट झालेला नाही. जोपर्यंत वकीलाला अटक होत नाही तोपर्यंत काहीही म्हणले जाऊ शकत नाही. वकीलाचे नाव तेव्हा समोर आले जेव्हा अटक झालेल्या चारही युवकांपैकी एकाने हे सांगितले की, त्याने त्याच्यासोबत डिस्कशन केले होते आणि काही पैसेही दिले होते.  

 

चार-पाच दिवसांपूर्वी केले होते हल्ल्याचे प्लॅनिंग... 
हल्ल्याचे प्लॅनिंग चार-पाच दिवसांपूर्वी केले होते. हल्लेखोरांना विक्टिमच्या मॉर्निंग वॉकचे प्रत्येक दिवसाचे प्रॉपर शेड्यूल दिले गेले होते. बी.कॉम करत आहेत जीशान आणि त्याच्या बी.एम.एम. करत असलेला भाऊ अल्तमशने हल्ल्याचे प्लॅनिंग केले. अराफात अहमद अलीने जीशानची टू-व्हीलर चालवली आणि जितिन संतोष कुरियनने विक्टिमच्या हातावर चाकूने हल्ला केला. सोबतच एक पेपर फेकला, ज्यावर लिहिले होते, 'केस परत घे.' एवढेच नाही, कुरियरने महिलेला एका बॉटल दाखवून अॅसिड अटॅकची धमकी दिली.  

 

युवकांना मिळत आहे जमीन... 
रिपोर्ट्समध्ये हेही लिहिले गेले आहे की, चारही युवकांना शुक्रवारी अंधेरी मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेटच्या न्यायालयात सादर केले गेले. जेथून त्यांनी 15000 रुपये  जामिनावर सुटत आहे. त्यांना आयपीसीच्या सेक्शन 324 (जखमी केल्याबद्दल), 506 (II) (धमकी दिल्याबद्दल) आणि 34 (इतर हेतू) अंतर्गत अटक केली गेली होती.