आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- उसनवारीचे पैसेे मागितल्याचा राग आल्याने एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना सोमवारी दुपारी १२ वाजता तांबापुरा भागात घडली. जखमी तरुणावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


आकाश रवींद्र बाविस्कर (वय २२, रा. तांबापुरा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. आकाश याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे सचिन भोई (पूर्ण नाव माहित नाही) याच्याकडे पैसे घेणे होते. सोमवारी आकाशने पैसे मागण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघांमध्ये वाद झाले. सचिनने आकाशच्या डाव्या हाताच्या दंडावर चाकूने वार केला. हे वार रोखण्याचा प्रयत्न केल्यामुळे आकशच्या दंडासह हाताच्या बोटांना दुखापत झाली. जखमी आकाशवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

बातम्या आणखी आहेत...