Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Knife attack on two students for the purpose of looting

लूटमारीच्या हेतूने दोन विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; औरंगाबादेतील सिडको एन-4 परिसरातील घटना 

प्रतिनिधी | Update - Feb 20, 2019, 07:48 AM IST

विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • Knife attack on two students for the purpose of looting

    औरंगाबाद- दोन दिवसांवर परीक्षा आलेली असताना बारावीच्या दोन विद्यार्थ्यांवर लूटमारीसाठी प्राणघातक हल्ला झाला. मंगळवारी रात्री सिडको एन-४ परिसरात साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. शहरातील व्यापाऱ्यांवर हल्ला होऊन लूटमारीच्या घटना ताज्या असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    केतन पठाडे आणि भूषण चंद्रकांत जोशी (दोघे रा. जयभवानीनगर) हे बारावीचे विद्यार्थी आहेत. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. केतन व भूषण यांनी अभ्यासिका लावली आहे. मंगळवारी रात्री ते दोघे अभ्यासिकेवरून पायी चालत घरी निघाले होते. काही अंतर चालल्यानंतर तीन लुटारूंनी त्यांना अडवले. त्यांच्याकडील साहित्य लुटण्याचा प्रयत्न करत दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यात भूषणवर एकाने चाकूने हल्ला केला, तर केतनचा गळा दाबला. घाबरलेल्या दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्याकडे असलेले मोबाइल घेऊन लुटारू पसार झाले. यातील भूषणच्या पायाला सात टाके पडले आहेत. व्यापाऱ्यांच्या लूटमारीच्या सलग घटना घडत असताना आता तरुणांनादेखील लक्ष्य केले जात आहे.

Trending