आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून युवकावर चाकूहल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चिलम ओढायला का गेला होतास, असे विचारल्यावरून रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास हमाल वाड्यातील जयविजय चौकात युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. यात तिघांनी युवकाच्या छाती, पाठ व बरगडीवर चाकूने वार केले आहेत. 


हमाल वाड्यातील सतीश दिवाकर महाजन (वय २६) असे जखमी युवकाचे नाव आहे. सतीश हा मालवाहू रिक्षा चालवतो. हमाल वाड्यात राहणाऱ्या त्याच्या मालकाकडे पैसे घेण्यासाठी तो गेलेला होता. या वेळी तेथे रवी सदाशीव पवार हा युवक आला. त्याच्यासोबत लाला उजदार व हनुमान पवार हे दोघे होते. सतीश याने रवीला चिलम ओढायला का गेला होतास, असे विचारले. त्याचा राग आल्याने रवी याने त्याच्याजवळील चाकूने सतीशच्या बरगडीवर, पाठीवर व छातीवर वार केले. हनुमान व लाला यानेही सतीश महाजन याला मारहाण केली. चाकू हल्ल्यात सतीश गंभीर जखमी झाल्यानंतर तिघे घटनास्थळावरून पळून गेले. तर जखमी सतीश महाजन हा रस्त्यावरच पडलेला होता. सतीशचे वडील व नातेवाईकांना त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, घटनास्थळी हमाल वाड्यातील नागरिकांसह परिसरातील बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती. 

 

थोडक्यात जीव बचावला 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अधिकारी दत्तात्रय बिराजदार यांनी त्याच्यावर उपचार केले. छाती व हृदयावर वार करण्यात आलेले आहेत. थोडेसे अजून खोलवर वार गेले असते तर हृदय व किडनीला इजा झाली असती. थोडक्यात त्याचा जीव वाचला असल्याचे डॉ. बिराजदार यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...