आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळ जन्मल्याने आनंद साजरा करू लागले कुटुंब, तेवढ्यात या भागावर पडली डॉक्टरांची नजर आणि सर्वांनाच बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - जेव्हा बाळ पोटात असते तेव्हा गर्भनाळ हेच त्याचे जीवन असते. आईच्या शरिरारातून बाळाला सर्व आवश्यक तत्वे गर्भनाळेतूनच मिळत असतात. गर्भनाळेत जराही समस्या असेल तर बाळाच्या जीवाला धोका असतो. पण अमेरिकेत एक असे प्रकरण समोर आले जे पाहून डॉक्टरही त्याला चमत्कार म्हणत आहेत.  


एका डॉक्टरने या घटनेबाबत सांगितले की, एक कपल बाळाच्या जन्माने अत्यंत आनंदात हबोते. महिलेने बाळाला जन्म देताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण या आनंदाच्या वातावरणात गर्भनाळेवर डॉक्टरांनी नजर गेली आणि संपूर्ण वातावरणच बदलून गेले. 


डोळ्यावर विश्वास बसला नाही 
गर्भनाळ पाहून डॉक्टरांना धक्का बसला कारण त्या नाळेला गाठ बसलेली होती. ती गाठ पाहून बाळ जीवंत नसेल असे डॉक्टरांना वाटले. पण तेवढ्यात बाळ जोराने रडायला लागले. ते ऐकूण बाळ जीवंत आहे हे डॉक्टरांना कळले. त्याचा आवाज ऐकल्यानंतर डॉक्टरांना विश्वासच बसत नव्हता. डॉक्टर्सने सांगितले की, गर्भनाळेला गाठ बसल्याने बाळासाठी आवश्यक तत्वे आणि ऑक्सिजन बाळाच्या शरिरापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. पण ही घटना चमत्कारच होती. बाळ पूर्णपणे सुदृढ होते. डॉक्टरांनी लगेचच गर्भनाळ कापली आणि बाळ वडिलांच्या हातात दिले. 

 

गर्भनाळेमुळे जाऊ शकतो जीव 
एक्सपर्ट्सने सांगितले की, गर्भाशयात बाळाचा विकास होतो आणि ते गर्भनाळेद्वारेच आईच्या शरीराशी जोडलेले असते. गर्भनाळ बाळासाठी लाइफलाइनसारखी असते. त्याच्या मदतीने बाळाला ऑक्सिजन आणि सर्व पोषक तत्वे मिळत असतात. पण तीच नाळ डिलिव्हरीच्या वेळी बाळासाठी धोकादायक ठरू शते. 
- अनेकदा डिलिव्हरीदरम्यान गर्भनाळ गर्भाशयाबाहेर येते आणि या स्थितीत ती बाळाच्या शरीराला गुंडाळली जाते. त्यामुळे बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा स्थितीत आई बाळाला जन्म तर देते पण मेंदुला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने बाळाचा मृत्यू होऊ शकतो. 


जास्त अॅक्टीव्ह बाळालाही धोका 
बाल गर्भाशयात जास्त लाथ मारत असेल किंवा फिरत असेल तर अशाप्रकारची गाठ बसण्याची शक्यता असते. ही गाठ अतिशय सैल असते. पण डिलिव्हरीच्या वेळी ती अधिक घट्ट बनते. एक्सपर्ट्सच्या मते, ज्या मुलांची गर्भनाळ अधिक लांब असते तिला गाठ बसण्याची शक्यता अधिक असते. 2 हजारांपैकी एका मुलाची ही अडचण असते. 

 

बातम्या आणखी आहेत...