अष्टविनायक / अष्टविनायक : दक्षिणायनात सूर्योदयाची किरणे पडतात बल्लाळेश्वर मूर्तीवर 

बल्लाळेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणायनात सूर्योदयाची किरणे श्री बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात. या किरणांमुळे श्रींच्या डोळ्यातील व नाभीतील हिरे झळाळतात.... 

Sep 05,2019 12:10:00 AM IST

बल्लाळास प्रसन्न होऊन श्री विनायक या ठिकाणी शिळारूपी पाषाण मूर्तीत अंतर्धान पावले. या स्थानास सरसगडच्या किल्ल्याची व आंबा नदीच्या प्रवाहाची पार्श्वभूमी लाभली आहे. बल्लाळाची कथा गणेश पुराण व मुद‌्गल पुराणात आहे. कल्याण नावाच्या व्यापाऱ्याच्या बल्लाळ या मुलास भक्तिमार्गास प्रवृत्त केले. त्यामुळे गावातील मुलांचे अध्ययन व व्यवहाराकडे दुर्लक्ष हाेऊ लागले. हे पाहून पित्याचा क्रोध अनावर झाला. त्याने बल्लाळाच्या गणेशास दूर फेकून दिले. बल्लाळाने गणेशाची आराधना केली. श्री गणेश त्यास प्रसन्न झाले व त्याच्या विनंतीवरून पाषाणरूपी मूर्तीत प्रकट होऊन येथेच राहिले. येथे बल्लाळेश्वर नावाने ओळखले जाते.


आकर्षक मूर्ती : मूर्ती अर्धगोलाकार असून डाव्या सोंडेची आहे. मंदिराचे काम चिरेबंंदी पाषाणाचे आहे. मंदिरात दोन भव्य गाभारे आहेत. आतील गाभाऱ्यात अष्टदिशा साधून अष्टकोनी कमळ तयार केलेे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून दक्षिणायनात सूर्योदयाची किरणे श्री बल्लाळेश्वराच्या मूर्तीवर पडतात. या किरणांमुळे श्रींच्या डोळ्यातील व नाभीतील हिरे झळाळतात.


जवळची ठिकाणे : सरसगड किल्ला, सिद्धेश्वर शंकराचे स्वयंभू स्थान, उन्हेरे गरम पाण्याचे झरे, सुधागड किल्ला, ठाणाळे लेण्या.

X