नवी दिल्ली- तुम्हाला हे जाणू हैराणी होईल की, जगातील सगळ्यात मोठे इनेव्हेस्टर आणि तिसरे श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांच्याकडे स्वत:चा आयफोन किंवा स्मार्ट फोन नाहीये. 5.62 लाख कोटींचे मालिक असलेले बफे यांचे फोन बनवणारी कंपनी अॅप्पलमध्ये 2.5 टक्के स्टॉक आहेत, पण तरिही त्यांच्याकडे मोबाईल फोन नाहीये. बफे यांना त्यांच्या साध्या राहणीमुळे ओळखले जाते. त्यांच्याबद्द्ल सांगितले जाते की, ते ई-मेलचा वापर करत नाहीत, आतापर्यंत त्यांनी फक्त 1 ई-मेल पाठवला आहे.
25 वर्षांपर्यंत वापरतात एकच वस्तु
वॉरेन बफे यांच्याजवळ नोकियाचा जुना फ्लिप फोन आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, हा फोन त्यांना अॅलेक्जेंडर ग्राहम बेल यांनी दिलेला आहे. त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, त्यांना एकच वस्तू 20 ते 25 वर्ष वापरतात.
59 वर्षे जुन्या घरात राहतात
इतके श्रीमंत व्यक्ती असूनही ते अजून तेच साधे जिवन जगतात जे त्यांनी त्यांच्या सुरूवातीच्या काळात जगले आहे. ते आजही त्यांनी 1958 मध्ये 20 लाख रूपये(31500 डॉलर) ला घेतलेल्या घरात राहतात.