आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे महाराष्ट्राचे पहिले नेते असतील, बाळासाहेबांच्या आदेशावरून राजकारणात झाले सक्रिय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सांगतात की, त्यांना राजकारणापेक्षा कायम फोटोग्राफीत रस राहिला आहे
  • 2003 मध्ये बाळासाहेबांनी उद्धव यांची शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे कोणतीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री होणारे राज्याचे पहिले नेते ठरतील. बुधवारी झालेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. उद्धव मुख्यमंत्री बनणारे शिवसेनेचे तिसरे नेता आहेत. याअगोदर शिवसेनेचे मनोहर जोशी आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले आहेत.  
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी देखील कधीच निवडणूक लढवली नाही. ते नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत राहिले होते. या विधानसभा निवडणुकीत ठाकरे कुटुंबातून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य वरळी मतदारसंघातून विधानसभेत गेले आहेत. 

वडिलांच्या आदेशावरून राजकारणात सक्रिय झाले उद्धव 


27 जुलै 1960 रोजी मुंबईत जन्मलेले उद्धव जेजे स्कूलमधून पदवीधर आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, दोन मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे. आदित्य ठाकरे आमदरा आणि युवा सेनेचे अध्यक्ष आहेत. तर तेजस ठाकरे अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीत रस असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. परंतु वडिलांच्या आदेशावरून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सक्रिय झाले. बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे बीएमसी निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. उद्धव ठाकरेंनी ती उत्तम प्रकारे पार पाडली. 2003 मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनले


यानंतर बाळासाहेबांनी 2003 मध्ये उद्धव यांचा राजकारणातला सहभाग वाढवण्यासाठी त्यांना शिवसेनेचा कार्यकारी अध्यक्ष नियुक्त केले होते. यानंतर बाळासाहेबांनी 2004 मध्ये त्यांना पक्षाचा पुढील अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली होती. राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी शिवसेनेचा पाया रचला.

सामनातील लेखाद्वारे आपली आक्रमक प्रतिमा निर्माण केली


उद्धव यांची प्रतिमा स्वभावाने अंतर्मुखी राजकारण्याच्या स्वरुपात होती. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी ते माध्यमांपासून लांब राहत होते. मात्र पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळाल्यानंतरही उद्धव यांना प्रतिमेच्या बाहेर येण्यास वेळ लागला. यानंतर त्यांनी वडिलांप्रमाणे आक्रमक भूमिका बजावण्यास सुरुवात केली. विधानांसोबत त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये लेख लिहून पक्षाची आक्रमक भूमिका मांडण्यास सुरुवात केली आणि पुढेही कायम ठेवली. 

बातम्या आणखी आहेत...