या दिवशी संबंध ठेवल्याने होतो अशा अपत्याचा जन्म, आई-वडिलांच्या आयुष्यात येऊ शकतो प्रलय
शास्त्रांचे आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. यामध्ये मनुष्य गर्भात येण्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी सविस्तर
-
शास्त्रांचे आपल्या आयुष्यात विशेष महत्त्व आहे. यामध्ये मनुष्य गर्भात येण्यापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगण्यात आल्या आहेत. मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टींविषयीसुद्धा शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. यामध्ये मनुष्य जीवनाच्या प्रत्येक संस्काराप्रमाणे गर्भसंस्काराचाही उल्लेख आहे. गर्भसंस्कारमध्ये पती-पत्नीने कोणत्या दिवशी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आणि कोणत्या दिवशी चुकीचे राहते आणि यामागचे कारणही सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला या विषयी खास माहिती देत आहोत.
गर्भ उपनिषदमध्ये स्त्री-पुरुष संबंधाविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. यामध्ये आईच्या गर्भात कशाप्रकारे शिशूचा जन्म, विकास होते आणि 9 महिने गर्भ काय विचार करतो याविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर गर्भ उपनिषदमदहये किन्नरांच्या उत्पत्तीविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे.
गर्भ उपनिषदानुसार मंगळवारचा दिवस अपत्य प्राप्तीसाठी अशुभ मानला जातो. कारण मंगळ शनी ग्रहाचा स्वामी आहे. मंगळाला अत्यंत क्रोधी आणि विनाशकारी मानले जाते. पती-पत्नीने अपत्य प्राप्तीसाठी या दिवशी शारीरिक संबंध ठेवू नयेत.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या संदर्भातील आणखी माहिती... -
या दिवशी संबंध ठेवल्याने महिला गरोदर राहिल्यास जन्माला येणारे अपत्य अत्यंत क्रोधी आणि अहंकारी स्वभावाचे बनते. हे अपत्य नेहमी हट्ट करणारे आणि कोणाचेही न ऐकणारे, हिंसक बनू शकतात. यांच्यामुळे आई-वडील आणि इतरही नातेवाईकांना आयुष्यभर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यांच्यावर मंगळ ग्रहाचा एवढा प्रभाव राहती की, यांना चांगल्या आणि वाईट गोष्टींमधील फरकही लक्षात येत नाही.
-
शास्त्रामध्ये किन्नर अपत्य कशामुळे जन्माला येते याविषयीसुद्धा सांगण्यात आले आहे. अशाप्रकारे आपल्या शास्त्रांमध्ये मनुष्य जीवनाशी संबंधित विविध गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे आणि या सर्व गोष्टींचा अवलंब करून आपण आपला भविष्यकाळ चांगला करू शकतो.