आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. 22 नोव्हेंबर 2009 दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव वियान आहे.
शाल विकून सुरु केला बिझनेस...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा देशातील प्रसिद्ध नाव आहे. एक यशस्वी बिझनेसमन म्हणून लोक त्यांना ओळखतात. स्वबळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, राज कुंद्रा यांच्याकडे तब्बल 2400 कोटींची संपत्ती असल्याचे वृत्त आहे.
एका मुलाखतीत राज कुंद्रा यांनी म्हटले होते, की आज मी सुखी आणि आरामदायक आयुष्य जगत आहे. मात्र माझे बालपण अगदी याउलट होते. आज राज कुंद्रांकडे लग्झरी कारचे कलेक्शन आहे. एकेकाळी ते त्यांच्या स्वप्नवतच होते.
वयाच्या 18व्या वर्षी सुरु केला स्वतःचा व्यवसाय...
एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले राज कुंद्रा यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हटले, की एकतर आमचे रेस्तराँ चालव, किंवा स्वतःचे काम सुरु कर. आईवडिलांचे म्हणणे त्यांनी गांभीर्याने घेतले आणि कामाला लागले.
काही पैसे घेऊन ते दुबईत गेले. हि-यांच्या व्यापा-यांची भेट घेतली. मात्र तेथे त्यांना काम मिळाले नाही. तेथून राज नेपाळला गेले. तेथे पशमीना शाल खरेदी केल्या आणि ब्रिटेनमधील एका ब्रॅण्डेड स्टोअरच्या मदतीने त्याची विक्री सुरु केली. अल्पावधीतच त्यांचा बिझनेस वाढू लागला. हा व्यवसाय सुरळीत सुरु झाल्यानंतर राज हि-यांचा व्यापार करण्यासाठी पुन्हा दुबईत गेले.
तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आज वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या 10 कंपन्या आहेत. 2004 मध्ये एका ब्रिटीश मॅगझिनने त्यांना सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत 198 वे स्थान दिले होते.
पुढे वाचा, राज कुंद्रा यांच्या बिझनेसविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.