Home | Gossip | Know about salman khan and iulia vantur relationship

खरेच युलिया-सलमानमधील नाते गंभीर आहे? गोव्यात एकत्र घालवल्यानंतर दोघंही सोबतच मुंबईत परतले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 09, 2019, 10:58 AM IST

यूलियाला प्रेमाने या नावाने हाक मारतो सलमान

 • Know about salman khan and iulia vantur relationship

  सलमानचे त्याची रोमानियन मैत्रीण यूलिया वंतूर हिच्यासोबत असलेल्या मैत्रीबाबत सर्वांनाच कल्पना आहे. पण आजकाल ही मैत्री जरा जास्तच घट्ट झाली आहे. सलमान आपल्या या खास मैत्रिणीबरोबर एकदम छान वेळ घालवत आहे. हे दोघेही गोव्यात नवीन वर्ष साजरे करताना दिसले. यूलियाने त्याचे काही वीडियोही शेअर केले आहेत. याआधी यूलिया सलमानच्या वाढदिवशी त्याच्या पनवेलमधील फार्म हाउसवरही दिसली होती. याबाबतच्या एका वीडियोमध्ये ती सलमानला शुभेच्छा देतानाही दिसली होती. सलमान आता गोव्याहून मुंबईला परत आला आहे. त्यांच्यातील या जुगलबंदीमुळे दोघात असलेले नाते मैत्रीपेक्षाही काही वेगळेच असल्याचे यावरून स्पष्ट होते. शिवाय दोघेही आपल्या या नात्याबाबत जरा गंभीर आणि जबाबदार दिसत आहेत.

  मी एकटा नाही
  नुकतेच 'द कपिल शर्मा शो' मध्ये आलेल्या सलमानने स्पष्ट शब्दांत सांगितले होते की तो एकटा नाही. त्याच्या जीवनात कुणीतरी आहे.

  मदतही केली
  सलमान आणि यूलियाचे संबंध 2013 पासून आहे. ती जेव्हा भारतात आली होती तेव्हा सलमानने तिची मदत केली. यासोबतच तिला काही कामेही दिली होती.

  यूलियाला प्रेमाने काय म्हणतो सलमान?
  सलमान खान कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरला प्रेमाने काय म्हणतो हे कदाचित कुणालाच माहिती नाहीये. मात्र काही काळापुर्वी माहिती समोर आली होती, त्यात खुलासा झाला होता, की सलमान यूलियाला प्रेमाने 'यू' म्हणतो. सलमानशी निगडित एका सूत्राने ही माहिती दिली होती.

  कुठली आहे यूलिया
  - यूलिया वंतूर रोमानियाची रहिवासी आहे. ती मॉडेल तसेच टीव्ही होस्टसुध्दा आहे.
  - 2006 मध्ये यूलियाने टीव्हीत करिअर करण्यास सुरुवात केली. तिने PRO टीव्हीसाठी मॉर्निंग न्यूज शो होस्ट केला होता.
  - ती आठवड्याच्या अखेर मॉर्निंग न्यूज वाचत होती आणि वर्षातून एकदा कार्यक्रमात को-होस्टसुध्दा करत होती.
  - यूलियायाने स्टीफन बनीकासोबत डान्सिंग प्रोग्राममध्येसुध्दा केले आहेत.
  - ती स्पोर्ट्सटची समर्थक आहे. ती लहान असताना व्हॉलीबॉल खेळत होती. ती टेनिस आणि बास्केटबॉलदेखील खेळायची.
  - तिने 2014मध्ये 'ओ तेरी' या बॉलिवूड सिनेमात आयटम नंबर केला होता. हा सिनेमा सलमानचा भावोजी अतुल अग्निहोत्रीने निर्मित केला होता.

  विवाहित आहे यूलिया...
  - मीडिया रिपोर्ट्सनुसार, लुलियाचे एक लग्न झाले आहे.
  - सूत्रांच्या सांगण्यानुसार, तिने रोमच्या मारिअस मोगासोबत लग्न केले. मारिअस मोगा गीतकार, गायक आणि निर्माता आहे. तो यूरोपमध्ये राहतो. लुलिया आणि मारिअसचे लग्न 7 ऑगस्ट 2012मध्ये झाले होते.
  - दोघांचे दिर्घकाळापासून नाते होते. यांच्या रोमान्स बातम्या शहरातील वर्तमानपत्रात हेडलाइन असायच्या, पण आता ते एकत्र राहत नाहीत.
  - मात्र त्यांनी घटस्फोट घेतला, की नाही हे अद्याप समोर आलेले नाहीये.

Trending