आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात वीज नव्हती म्हणून IPL चा लिलाव पाहायला मिळाला नव्हता, आता ये टीममधून केले डेब्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क- जम्मू-काश्मीर राज्याच्या रसिख सलामला रविवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये मुबई इंडियन्सकडून आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपीटल्सविरूद्ध गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. तो आईपीएलमध्ये खेळणारा काश्मीरचा तिसरा खेळाडू आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला इनिंगची पहिली ओव्हर टाकायला मिळाली. त्याने पहिलाच नो बॉल टाकला आणि दुसऱ्याच बॉलवर शिखर धवनला आउट केले,पण फ्री हीट असल्यामुळे आउट नाही दिले. 4 ओव्हरमध्ये सलामने 42 रन दिले. त्याच्यासाठी आयपीएलपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. डिसेंबर 2018 मध्ये मुंबई इनिंयन्सने त्याला बेस प्राइस 20 लाखात खरेदी केले. एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, सलामच्या घरात सकाळी वीज नसल्यामुळे त्याला त्याच्या सलेक्शनची माहिती रात्री उशीरा मिळाली.

 
जम्मू-काश्मीरमधून आयपीएल खेळणारा तिसरा खेळाडू
रसिख सलामचे पूर्ण नाव रसिख सलाम डार आहे. त्याचा आयपीएलपर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. जम्मू-काश्मीरकडून आयपीएल खेळणारा तो तिसरा खेळाडून आहे. परवेज रसूल आणि मंजूर डारनंतर रसिखला या टूर्नामेंटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. रसिख दक्षिण काश्मीरच्या आतंकवादीग्रस्त कुलगाम या गावातील राहणारा आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या एका सदस्याची नजर त्याच्यावर पडली आणि त्याने रसिखला ट्रायल्ससाठी बोलवले. ट्रॉयलमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्यानंतर लिलावात मुंबईने त्याला 20 लाख रूपयांत खरेदी केले. 


या टूर्नामेंटमध्ये घेतली होती हॅटट्रिक
रसिख राइटआर्म फास्ट बॉलर आहे. पेससोबतच तो चेंडूला स्विंग करतो आणि हेच त्याचे वैशिष्ट आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये  सलामने 30 डिसेंबर 2018 ला डेब्यू केले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या एका ट्रायल मॅचमध्ये सलामने हॅट-ट्रिक घेतली होती. त्या मॅचमध्ये त्याने चार विकेट्स घेतल्या होत्या, त्यावेळी त्याच्या बॉलिंगचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
 

बातम्या आणखी आहेत...