हे माहीत आहे / रेल्वे तिकिटाबद्दल हे जाणून घ्या

प्रवाशांना अधिकाधिक सोयीचं व्हावं या उद्देशानं रेल्वेनं तिकीट बुकिंगसंदर्भात काही महत्त्वाचे बदल केले आहेत

Dec 03,2019 12:15:00 AM IST
प्रवाशांना अधिकाधिक सोयीचं व्हावं या उद्देशानं रेल्वेनं तिकीट बुकिंगसंदर्भात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये आयआरसीटीसी वेबसाइटच्या इंटरफेसमध्ये काही मोठे बदल केलेत. वेबसाइटवरील अपडेट पर्यायासोबतच आता ट्रेन तिकीट शोधण्याचा पर्याय होमपेजवर ठेवण्यात आला आहे. शिवाय तिकीट बुकिंगसाठी ट्रेन क्रमांक शोधण्यासाठी आता वेबसाइटवर लॉगइन करण्याची आवश्यकता उरणार नाही. ‘बुक युवर तिकीट’चा पर्यायही वेबसाइटच्या डाव्या बाजूलाच उपलब्ध करून देण्यात आलाय. जर तुमचं तिकीट बुक झालेलं आहे आणि तुम्हाला फक्त तुमचा पीएनआर स्टेटस चेक करायचा असेल तर तो पर्यायही वेबसाइटच्या होमपेजवरच उपलब्ध करून देण्यात आला आहे.
X