आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्व पक्षांना स्वीकारार्ह असलेल्या अटलजींच्या जीवनाची झलक त्यांच्या कवितांत प्रतिबिंबित हाेते. याच काव्यअाेळींच्या माध्यमातून त्यांचे विराट व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
अटलजी म्हणायचे- ‘माझी कविता युद्धाची घाेषणा अाहे, ती पराभवाची प्रस्तावना नाही. ताे पराभूत सैनिकाचा नैराश्य-निनाद नाही, लढवय्या योद्ध्याचा जय संकल्प अाहे, ती निराशेचा स्वर नाही, तर आत्मविश्वासाचा जयघोष!
अटलबिहारी वाजपेयी हे देशाच्या इतिहासातील त्या निवडक नेत्यांपैकी अाहेत, ज्यांनी अापले नाव, व्यक्तिमत्त्व व करिष्म्याच्या बळावर सरकार बनवले. अटलजी यांचे व्यक्तित्व इतके माेठे अाहे, तसे जगातील माेजक्याच नेत्यांचे हाेते. सत्तेत असाे वा विराेधात, त्यांच्या निर्णयांनी देशाने गर्वाची अनुभूती केली. त्यांच्या जाण्याने राजकारणात निर्माण झालेली पाेकळी कदाचितच भरली जाऊ शकेल. वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत झाला अाहे.
> निवडणूक हरले, पद गेले; पण हार मानली नाही
टूटे हुए सपने की सुने कौन सिसकी, अंतर को चीर व्यथा पलकों पर ठिठकी
हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा। काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं
वाजपेयी यांनी १९८० मध्ये भाजपचा पाया रचला; परंतु १९८४ मध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या. त्यांचे अध्यक्षपद गेले व पक्षाची सूत्रे एल.के. अडवाणींच्या हातात गेली. यामुळे ते निराश झाले; परंतु हिमतीने लढून पक्षाला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहिले. विराेधी पक्षांनी दिलेले पंतप्रधान -पदाचे अामिषही धुडकावून लावले हाेते.
> विनम्र राहिले, सर्वांना साेबत घेऊन चालले
मेरे प्रभु| मुझे इतनी ऊंचाई
कभी मत देना
गैरों को गले न लगा सकूं
इतनी रुखाई कभी मत देना।
अटलजींनी नेहमीच मानवता धर्माचे पालन केले. त्यांचे मित्र मुन्ना हे भेटण्यासाठी दिल्लीत अाले. कागदावर लिहिले- दादा, नमस्कार! तुमचा मुन्ना. ताे कागद मिळताच धावत जाऊन मुन्नाला भेटले. त्यांनी २४ पक्षांसाेबत असे अाघाडी सरकार चालवले.
> प्रत्येक वेळी दुप्पट ताकदीने उठले
आहुति बाकी यज्ञ अधूरा
अपनों के विघ्नों ने घेरा
अंतिम जय का वज्र बनाने-
नव दधीचि हड्डियां गलाएं।
वाजपेयी हे १९९६ मध्ये पीएम बनले. संख्याबळ नसल्याने १३ दिवसांतच सरकार पडले. दुसऱ्यांदा १९९९ मध्ये १३ महिन्यांत पडले. तेव्हा अण्णाद्रमुकने पाठिंबा काढला हाेता. १९९९मध्ये वाजपेयींचे प्रयत्न फळाला अाले. ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
> दु:ख देणाऱ्यांनाही शिकवण देत राहिले
बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं
टूटता तिलिस्म आज सच से भय खाता हूं,
लगी कुछ ऐसी नजर बिखरा शीशे सा शहर,
अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं। गीत नहीं गाता हूं।
गुजरात दंगलीवेळी २००२ मध्ये वाजपेयींनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला. पक्षाच्या गोव्यातील अधिवेशनात मोदींना सीएमपदावरून हटवू इच्छित हाेते; परंतु आडवाणींपुढे त्यांचे चालले नाही व सर्वांचा निर्णय मानावा लागला.
> पाकला इशारा, उधारीचे स्वातंत्र्य कुठपर्यंत!
अमरीकी शस्त्रों से अपनी आजादी को कायम रख लोगे, यह मत समझो।
दस बीस अरब डालर लेकर बरबादी से तुम बच लोगे, यह मत समझो।
भारत व पाकच्या संबंधात कधीही सुधारणा हाेऊ शकली नाही. अटलजींनी पाकशी मैत्रीसाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले; परंतु पाकने नेहमी पाठीमागून वार केला. अटलजींनी कविता ‘पड़ोसी से’ पाकला अारसा दाखवला व अमेरिकेच्या मदतीने कुठपर्यंत स्वत:चे स्वातंत्र्य वाचवू शकाल! असा इशाराही दिला.
> शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष, लढत राहिले
मौत से ठन गई!
जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,
रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा जिन्दगी से बड़ी हो गई।
अटलजींच्या कवितेच्या या अाेळी त्यांची खालावणारी-सुधारणारी प्रकृती सांगतात. २००९ नंतर त्यांचा आवाज एेकायला मिळाला नाही. त्या वर्षी त्यांना ब्रेनस्ट्रोक अाल्याने बोलण्यात अडचणी येऊ लागल्या. परिणामी, त्यांना सर्वांपासून वेगळे ठेवले गेले. सर्वांसाेबत राहणारे अटलजी नंतर एकटे पडत गेले.
पुढील स्लाइडवर वाचा, नेहरूंशी निगडित किस्से आणि ‘भास्कर’साेबत अटलजी...
हेही वाचा,
अटलजींचे 4 ऐतिहासिक भाषणे: आम्हाला अचानक एवढी मते पडली नाहीत, हे कष्टाचे फळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.