पाकिस्तानवर 1000 किलो / पाकिस्तानवर 1000 किलो बॉम्ब टाकून येणारा Mirage 2000; जाणून घ्या या लढाऊ विमानाबद्दल सर्वच

दिव्य मराठी वेब टीम

Feb 26,2019 12:35:00 PM IST

नॅशनल डेस्क - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. 1971 नंतर भारताने अशा स्वरुपाचा हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज-2000 विमानांनी ही ऐतिहासिक कारवाई केली. तसेच जैशच्या तीन ठिकाणांवर 1000 किलो बॉम्ब टाकले. नेमके कसे आहे हे विमान आणि काय आहेत याची वैशिष्ट्ये याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.


हे विमान डासो एव्हिएशनने तयार केले आहे. रफाल लढाऊ विमान सुद्धा या विमान कंपनीने तयार केले आहेत. भारत आणि फ्रान्समध्ये या विमानांचा देखील सौदा झाला. फ्रान्सच्या डासोने मिराज 2000 ची निर्मिती मिराज III ची जागा घेण्यासाठी केली होती. एक हल्के परंतु शक्तीशाली फायटर जेट म्हणून हे विमान विकसित करण्यात आले आहे. मिराज 2000 विमानाने सर्वप्रथम 1970 मध्ये उड्डान घेतले होते. हे विमान मल्टीरोल सिंगल जेट इंजिन असलेले चौथ्या जनरेशनचे विमान आहे. विविध देशांच्या हवाई दलांमध्ये हे विमान सेवा देत आहेत. मिराज विमानाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यानंतर या विमानाचे मिराज 2000N आणि मिराज 2000D स्क्राइक व्हॅरिएंट सुद्धा बनवण्यात आले. या विमानाच्या तंत्रज्ञानात वेळोवेळी मागणीनुसार, बदल करण्यात आले आहेत.


अशी आहे मारक क्षमता
आतापर्यंत 600 मिराज 2000 विमानांची निर्मिती झाली आहे. तसेच 9 देश हे विमान आपल्या संरक्षण दलांमध्ये वापरत आहेत. मिराज लढाऊ विमान DEFA 554 स्वयंचलित तोफांनी सज्ज आहे. या तोपला 30 मिमी रिव्हॉल्वर लावले आहे. तोफांमध्ये 1200 पासून 1800 राउंड प्रति मिनट फायरिंग क्षमता आहे. ऑक्टोबर 1982 मध्ये भारताने 36 सिंगल सीटर सिलिंडर मिराज 2000 एचएस आणि 4 ट्विन सीटर मिराज 2000 टीएसएस ऑर्डर केल्या होत्या. यात एचचा अर्थ हिंदुस्थान असा आहे.

मिराज-2000 च्या स्पेशिफिकेशन्स
- मिराज-2000 में सिंगल शाफ्ट इंजिन वापरला जातो. हे इंजिन हल्के आणि इतर फायटर जेटसारखेच असते. फायटर जेटमध्ये सहसा एकच वैमानिक असतो. परंतु, आवश्यकतेनुसार यात दोन फायटर पायलट सुद्धा प्रवास करू शकतात.
- या विमानाची लांबी 14.36 मीटर आणि पंखांची रुंदी 91.3 मीटर आहे. विमानाचे ड्राय वजन 7500 किलो आणि टेक ऑफ करताना याचे वजन 17 हजार किलो सुद्धा होऊ शकते.
- मिराज-2000 ची मॅक्सिमम स्पीड ताशी 2,336 किमी आहे. एकदा टँक फुल केल्यास न थांबता 1550 किमी पर्यंत प्रवास करण्यास सज्ज आहे.
- मिराज-2000 मध्ये लेझर गायडेड बॉम्ब, हवेतून हवेत आणि हवेतून जमीनीवर मारा करण्यास सक्षम मिसाइल लावले जाऊ शकतात.

X
COMMENT