• Home
  • Business
  • know everything about Post Office Recurring Deposit Account RD new interest rate

Banking / आरडी/ पोस्‍ट ऑफिसच्या या गल्ल्यात जमा करा मंथली 1 हजार रूपये, मिळतील 72 हजारपेक्षा जास्त रिटर्न


मोठ्या बचतीसाठी पोस्ट ऑफीसची आरडी करेल मदत

दिव्य मराठी

Jun 30,2019 03:58:00 PM IST

नवी दिल्ली- जेव्हा कधी मोठ्या पैशांची गरज भासते, तेव्हा नोकरदार लोक कर्ज घेण्याचा विचार करतात. नोकरी करताना आपल्याला जेमतेम पगार मिळतो, त्यामुळे नोकरदारवर्ग मोठी बचत करू शकत नाहीत. पण जर छोटी-छोटी बचत केल्यास काही वर्षातच तुमच्याकडे मोठी रक्कम जमा होऊ शकते, आरडी एक असेच ऑप्शन आहे. पण, सरकारने सध्या जुलै-सप्टेंबर त्रैमासिकात लहान रकमेच्या व्याज दरावर 0.10 टक्के कपात केली आहे. त्यामुळेच तुम्हाला आता आरडीवर 1 जुलैपासून 7.30 टक्क्यांऐपजी 7.20 टक्के व्यज मिळेल.

मोठ्या बचतीसाठी पोस्ट ऑफीसची आरडी करेल मदत
पोस्‍टाच्या रेकरिंग डिपॉजिट किंवा RD मोठ्या बचतीसाठी तुमची मदत करू शके. तुम्ही याचा वापर गल्लाप्रमाणे करू शकता. म्हणजे तुम्ही दरमहिना एक ठरलेली रक्कम यात टाकली आणि 5 वर्षानंतर मॅच्यौर झाल्यानंतर तुमच्या हाती एक मोठी रक्कम असेल. घरातील गल्ल्यात पैसे जमा केल्यावर तुम्हाला व्याज मिळत नसेल, पण यात जमा पैशांवर तुम्हाला चांगले व्याज मिळेल. सरळा भाषेत सांगायचे झाले तर, आरडी एक एसा गल्ला आहे, ज्यात ठराविक वेळेनंतर तुमचे पैसे वाढतात. जाणून घ्या काय आहे स्किम...

लहान बचतीला मोठे करण्याचे चांगेल ऑप्शन आहे RD
RD एक प्रकारची स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. याचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसशिवाय बँकांमध्येही उघडू शकता. पण पोस्ट ऑफीसच्या आरडीवर इतर बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते. 1 जुलैपासून पोस्ट ऑफीसच्या आरडीवर 7.2% व्याज मिळणार आहे. देशातील इतर बँकामध्ये 5 टक्क्यांच्या आसपास व्याज मिळते. पोस्ट ऑफीस आरडीचा कालावधी 5 वर्षे आहे.

1000 रुपये दर महिना बचत करून 5 वर्षात जमवा 72 हजारपेक्षा जास्त
RD वर तुम्हाला कॉम्‍पाउंड इंन्‍ट्रेस्‍ट मिळते. प्रत्येत वर्षात मिळणारे व्याज तुमची मुळ रक्कम बनते. पोस्टात तुम्ही 10 रूपये दर महिना भरल्यास त्यावर मिळणाऱ्या 7.2 व्याजाच्या हिशोबाने 5 मैच्योर झाल्यावर 723 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही 1 हजार रूपये दर महिना भरल्यास तुम्हाला 5 वर्षानंतर 72 हजार मिळतील.

X