आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंगू / डास चावल्याने येते तीन प्रकारची ताप, डेंगूच्या बहुतांश प्रकरणांमध्ये डास चावल्याने येते हल्कीशी ताप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेंगूच्या प्रकरणांत डास चावल्यानंतर हल्कीशी ताप येते. परंतु, डेंगूच्या तापीचे (dengue fiver) एकूण तीन प्रकार आहेत.

क्लासिकल (सामान्य) डेंगू ताप - सामान्य डेंगू तापमध्ये ही ताप 5 ते 7 दिवसांपर्यंत राहते. यानंतर रुग्ण बरा देखील होतो. बहुतांश प्रकरणांमध्ये अशाच स्वरुपाच्या तापीचे प्रमाण असते.


Classical / क्लासिकल डेंगू तापीची लक्षणे
- थंडी वाजून येण्यासह अचानक उच्च ताप होणे
- डोके, मसल्स आणि जॉइंट्स यांच्यात वेदना होणे
- डोळ्यांच्या मागच्या बाजूला वेदना, डोळे दाबताच किंवा हात लावताच त्रास होणे
- खूप अशक्तपणा येणे, भूक न लागणे, मळमळ होऊ तोंडाचे स्वाद बिघडणे
- गळ्यात हलकीशी वेदना होणे
- शरीरात प्रामुख्याने चेहऱ्यावर, गळ्यावर आणि छातीवर लाल रंगाचे चट्टे येणे


डेंगू हॅमरेजिक फीव्हर (डीएचएफ) - dengue hemorrhagic fever (DHF) : क्लासिकल अथवा सामान्य डेंगू तापीच्या लक्षणांसह ही लक्षणे देखील आढळल्यास डीएचएफ होऊ शकतो. ब्लड टेस्टमधून याचा पत्ता लावला जाऊ शकतो.


डेंगू हॅमरेजिकची लक्षणे
- नाक आमि हिरड्यांमधून रक्त येणे
- शौच किंवा उलटी करताना रक्त येणे
- त्वचा आणि चेहऱ्यावर निळ्या-काळ्या रंगाचे डाग किंवा चट्टे येणे


डेंगू शॉक सिंड्रोम (डीएसएस) – dengue shock syndrome (DSS)
अशा प्रकारच्या तापीत DHF च्या लक्षणांसह 'शॉक' अवस्थेची लक्षणे सुद्धा दिसून येतात. 
- सतत बेचैन वाटणे
- तीव्र ताप येऊनही शरीर त्वचा थंड पडणे
- हळू-हळू रुग्ण बेशुद्ध पडणे
- रुग्णाची नाडी कधी तीव्र कधी धिम्या गतीने वाहणे, रक्तदाब अचानक कमी होणे


डेंगू तापीच्या प्रकारांमध्ये डेंगू हॅमरेजिक बुखार आणि डेंगू शॉक सिंड्रोम सर्वात घातक मानले जातात. सामान्य डेंगू ताप आल्यास आपण बरे देखील होतो. यातून जीव गमावण्याचा धोका नसतो. परंतु, DHF अथवा DSS ची लक्षणे दिसून आल्यास वेळीच उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे.


कधी दिसते आजारपण
डेंगूचा डास चावल्यानंतर 3 ते 5 दिवसांनंतर डेंगूच्या तापीची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. शरीरात ताप पसरण्याचा कालावधी 3 ते 10 दिवसांचा देखील असू शकतो.


आवश्य करा ही चाचणी
तीव्र ताप आणि जॉइंट्समध्ये वेदना होताच पहिल्याच दिवशी डेंगू टेस्ट करून घ्यावी. डेंगूच्या चाचणीत सुरुवातीला एंटीजेन ब्लड टेस्ट (एनएस-1) केले जाते. यात डेंगू नेमक्या कोणत्या प्रकारचा आहे याचा पत्ता लावला जातो. सुरुवातीलाच ही चाचणी घेतल्यास टेस्ट आणखी पॉझिटिव्ह असते. तर उशीरा केल्यानंतर डेंगूचा प्रकार डिटेक्ट होण्याची शक्यता कमी होत जाते. ही चाचणी रिकाम्या पोटी किंवा कशीही घेतली जाऊ शकते.