आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वापरायचे असेल फ्री WIFI, तर मग फॉलो करा या टीप्स...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील अनेक कंपन्यांनी फ्री इंटरनेट सर्विस देउन लोकांना त्याची सवय लावली आहे. प्रत्येकाला फ्री इंटरनेट हवे आहे. आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्ही फ्री वायफाय वापरू शकता. चित्रा गर्ग यांनी लिहीलेल्या स्मार्ट फोन यूझर गाइडमध्ये या टीप्स दिल्या आहेत.
 

फाइंड वाय-फाय फेसबुक अॅप
तुमच्या मोबाईलमध्ये फेसबूक अॅप असेल तर तुमचे काम होईल. या अॅपमध्ये वायफाय सर्च चे ऑप्शन आहे. फेसबूकच्या More मध्ये ते ऑप्शन मिळेल. यातुन जवळचे वायफाय मिऴू शकते. अनेक वायफाय ओपन असतात त्यांचा तुम्ही उपयोग करू शकता. ऑपरेटर्सकडून देण्यात येणाऱ्या वायफायचा तुम्ही उपयोग करू शकता.


वेफी प्रो
फ्री वाय-फायचा वापर करण्यासाठी या अॅपचा वापर केला जाउ शकतो. या अॅपला इंस्टॉल केल्यानंतर नेहमी वायफाय सर्च करण्याची गरज नाही, हे अॅप आपोआप वायफाय सर्च करेल. या अॅपमध्ये लोकेशन सर्विस आहे, त्यामुळे हे अॅप कुठे-कुठे वायफाय आहे त्याचा शोध घेईल. जर एकपेक्षा जास्ती वायफाय असतील तर हे अॅप त्यापैकी सगळ्यात फास्ट वायफायला कनेक्ट करेल. 


इंस्टाब्रीज
इंस्टाब्रीज एक चांगले अॅप आहे. यांतून तुम्ही फ्री वायफायचा वापर करू शकता. वायफायला हे अॅप आपोआप कनेक्ट करेल. वायफाय नसेल तर हे ऑटो मोबाईल नेटवर्कवर येईल.

बातम्या आणखी आहेत...