आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांका-निकच्या लग्नात 10 मिनिटे उपस्थित होते पीएम मोदी, दिले हे खास गिफ्ट, तुम्हीही तुमच्या लग्नात अशाप्रकारे पीएम मोदींना करु शकता आमंत्रित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मंगळवारी रात्री दिल्लीत झालेल्या प्रियांका-निकच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती होती. प्रियांका-निक यांचे दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये रॉयल रिसेप्शन झाले. व्हाइट कुर्ता-पायजामा आणि काळ्या रंगाच्या नेहरु जॅकेटमध्ये मोदी यावेळी दिसले. प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. ते प्रियांका-निक दोघांच्याही कुटुंबीयांना भेटले. 10 मिनिटे ते मंचावर उपस्थित होते आणि त्यांनी नवविवाहित दाम्पत्याला एक-एक गुलाबाचे फूल भेट म्हणून दिले. 


विशेष म्हणजे तुम्हाहीदेखील तुमच्या लग्नात पीएम मोदींना आमंत्रित करु शकतो. त्यांना आमंत्रित करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. दिल्लीत होणा-या अनेक इव्हेंट्समध्ये मोदी सहभागी होत असतात. आज आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्यांना कशाप्रकारे आमंत्रित करु शकता... 


लग्नासाठी कसे कराल आमंत्रित...

- जर तुम्हाला पीएम मोदींना लग्नात आमंत्रित करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला प्राइम मिनिस्टर ऑफिस (PMO) मध्ये संपर्क साधावा लागेल. तुम्ही पीएमओच्या पत्त्यावर (ई ब्लॉक, सेंट्रल सेक्रेट्रिएट, नवी दिल्ली 110011) लग्नाचे कार्ड पाठवू शकता. 

 

- याशिवाय तुम्ही स्वतः पंतप्रधानांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील खासदाराच्या मदतीने पंतप्रधानांना भेटण्याची वेळ घेऊ शकता.  

 

- तुम्ही पीएमओची वेबसाइट :pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ च्या माध्यमातूनही अपॉइंटमेंट घेऊ शकता. पण तुम्हाला भेटीचा वेळ मिळेल की नाही हे सर्वस्वी पंतप्रधानांवरच अवलंबून असते. अपॉइंटमेंट मिळाल्यानंतर पीएमओचे ऑफिसर खरंच तुमच्या आणि त्यांच्या भेटीचे कारण व्हॅलिड आहे की नाही याची चौकशी करतात. जर कारण व्हॅलिड असेल तर पंतप्रधानांना मेसेज दिला जातो. त्यानंतर त्यांच्या परवानगीने संबंधित व्यक्तीसोबत पीएमओच्या वतीने संपर्क साधला जातो. 

 

- 152, साउथ ब्लॉक, रायसीना हिल, नवी दिल्ली या पत्त्यावर तुम्ही पंतप्रधानांच्या भेटीसाठी रिक्वेस्ट लेटर पाठवू शकता. पंतप्रधान यांच्या घराचा पत्ता 7, रेसकोर्स रोड, नवी दिल्ली 110001 हा आहे. 

 

या 10 पद्धतीने तुम्ही साधू शकता पीएम मोदींशी संपर्क.. 
1. जर एखादा प्रश्न किंवा सजेशन असल्यास तुम्ही  www.pmindia.gov.in/en/interact-with-honble-pm/ वर लॉग इन करु शकता आणि स्वतःला रजिस्टर करु शकता. हे एक ऑफिशिअल पोर्टल असून या वेबसाइटला पंतप्रधानांसोबत संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आले आहे.  

 

2. तुम्ही पीएमच्या ऑफिशिअल पत्त्यावर पत्र पाठवू शकता. रिपोर्टनुसार, पीएम मोदींना दररोज दोन हजारांहून अधिक पत्र देशभरातून येत असतात. 


काय आहे ऑफिशियल अॅड्रेस :

वेब इन्फॉर्मेशन मॅनेजर, साउथ ब्लॉक, रायसीना हिल
नवी दिल्ली - 110011
फोन नंबर : 011- 23012312
फॅक्स : 23019545,23016857

 

तुम्ही  'ऑनरेबल प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, 7 रेसकोर्स रोड, नवी दिल्ली' एवढा पत्ता लिहूनही पत्र पाठवू शकता.  


3. आइडिया शेअरिंगसाठी तुम्ही  www.mygov.in वर लॉग इन करु शकता. येथे सजेशन आणि आयडिया देऊ शकता. 


4. RTI च्या माध्यमातूनहू पीएमओंना प्रश्न विचारले जाऊ शकतात.


5. @PMOIndia किंवा @Narendramodi वर ट्वीट करुन तुम्ही तुमचे म्हणणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू शकता.  मोदींच्या ट्वीटरवर 16 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

 

6. यू-ट्यूबच्या माध्यमातूनही तुम्ही तुमचे म्हणणे मोदींपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी तुम्ही Narendra modi's Youtube Channel वर जाऊन आपला मेसेज पाठवू शकता.  

 

7. Narendra modi Facebook Page किंवा fb.com/pmoindia वर जाकर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातूनही पीएमपर्यंत तुमचे म्हणणे पाठवू शकता. 

 

8. narendramodi1234@gmail.com ही पीएमचा इमेल आयडी आहे. हा इमेल आयडी त्यांच्या अँड्रॉइड अॅप पेजशी जुळले आहे.


9. याशिवाय तुम्ही इंस्टाग्राम, लिंक्डइनच्या माध्यमातूनही पीएशी संपर्क साधू शकता. इंस्टाग्रामसाठी https://www.instagram.com/narendramodi/ आणि लिंक्डइनसाठी  
https://in.linkedin.com/in/narendramodi वर जा. 


11. तुम्ही NaMo अँड्रॉइड अॅप डाउनलोड करुनही पीएम मोदींपर्यंत आपले म्हणणे पोहोचवू शकता.  
 

बातम्या आणखी आहेत...