आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

134 वर्षांपूर्वी एका ब्रिटीश अधिकाऱ्याने मुंबईत केली होती काँग्रेसची स्थापना, त्यांच्या निधनानंतर मिळाले स्थापनेचे श्रेय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसची स्थापना स्वातंत्र्याच्या 62 वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1885 रोजी झाली
  • निवृत्त ब्रिटीश अधिकारी ए.ओ ह्यू यांनी केली होती काँग्रेसची स्थापना

मुंबई - 28 डिसेंबर 1885 ला मुंबईत स्थापन झालेला काँग्रेस पक्षाला आज 134 वर्षे पूर्ण झाले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी पक्षाला राजकीय स्वरूप नव्हते, जन आंदोलन हा एक उद्देश होता. वेळेनुसार पक्षाचे रंगरूप दोन्ही बदलत गेले. पण बदलले नाही ते पक्षाशी निगडीत गांधी शब्द. गांधी आणि काँग्रेस एकमेकांचे पर्याय बनले आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला 134 वर्ष जुन्या काँग्रेसबद्दल महत्वाची बाब सांगत आहोत. एका ब्रिटीश अधिकाऱ्याने केली होती काँग्रेसची स्थापना 


काँग्रेसची स्थापना स्वांतत्र्याच्या 62 वर्षांपूर्वी 28 डिसेंबर 1885 रोजी झाली होती. मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते. कोलकाता उच्च न्यायालयाचे बॅरिस्टर व्योमेश चंद्र बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची पहिली संधी मिळाली. परंतु या पक्षाचा पाया भारतीयाने नव्हे तर एका ब्रिटीश अधिकाऱ्याने घातला होता. काँग्रेस पक्षाची स्थापना निवृत्त ब्रिटीश अधिकारी ए.ओ ह्यूम (अॅलन ऑक्टोव्हियन ह्यूम) यांनी केली होती. असे म्हटले जाते की, तत्कालीन वायसराय लॉर्ड डफरिन (1884-1888) यांनी देखील पक्षाच्या स्थापनेला समर्थन दिले होते. ह्यूम यांना निधनानंतर मिळाले पक्ष स्थापनेचे श्रेय 

एओ ह्युम पक्ष स्थापन झाल्यानंतर बर्‍याच वर्षांपासून पक्षाच्या संस्थापकांच्या नावापासून वंचित राहिले. 1912 मध्ये ह्यूम यांच्या मृत्यू पश्चात तेच पक्षाचे संस्थापक असल्याचे काँग्रेसने घोषित केले. काँग्रेसच्या स्थापनेसंदर्भात गोपाळ कृष्ण गोखले यांनी लिहिले की, ए ओ ह्यूम यांच्याशिवाय कोणताही व्यक्ती काँग्रेसची स्थापना करू शकत नव्हता. काँग्रेस आधी एक विचारधारा होती  

देशाला ब्रिटीश सत्तेपासून मुक्त करण्यात या पक्षाने दिलेले योगदान विसरता येणार नाही. स्वातंत्र्याच्यावेळी आणि त्यानंतरही लोक स्वतःला काँग्रेसशी जुडलेला असल्याचा अभिमान बाळगत असत. काँग्रेस पक्षासमवेत एक विचारधारा होती.

स्वातंत्र्याच्यावेळी अनेक मोठे नेते काँग्रेससोबत जोडलेले होते


काँग्रेस देशातील पहिला आणि मोठा राजयकीय पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल 60 वर्षांहून अधिक काळ देशात याच पक्षाचे सरकार होते. देशाचे संविधान तयार करण्यापासून ते देशातील प्रत्येक व्यवस्थेत काँग्रेसची छाप असल्याचे दिसून येते. देशातील सर्वात मोठे आणि महत्वाचे नेते, ते स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित असोत की स्वातंत्र्यानंतर, सर्वांचे राजकीय मूळ काँग्रेसशी निगडित होते. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार वल्लभ भाई पटेल किंवा सुभाष चंद्र बोस आणि इतर मोठ्या नेत्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात याच काँग्रेसमधून केली होती.