आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुण्यतिथी बाबत जाणून घ्या त्यांच्या आयुष्याशी निगडीत 10 गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची पुण्यतिथी आहे. जवाहरलाल नेहरूंचा 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता. पण नेहरू आजही देशवासियांच्या हृदयात आहेत. जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू तर आईचे नाव स्वरूपरानी होते. जवाहरलाल नेहरू कश्मीरी पंडित समुदायातून होते. यामुळे त्यांना पंडित नेहरू म्हटले जात असे. नेहरूंना लहान मुले फार आवडत असत. मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून हाक मारत होते. 


जवाहरलाल नेहरूंनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून लॉचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर 1912 मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिली करण्यास सुरूवात केली. ते 1919 मध्ये महात्मा गांधींच्या संपर्कात आले. ते गांधींच्या विचारांमुळे प्रभावित झाले. नेहरू गांधींप्रमाणेच कुर्ता आणि टोपी परिधान करण्यास सुरुवात केली. देशाच्या स्वातंत्र्यात नेहरूंचे मोठे योगदान होते. 1942 च्या 'भारत छोडो' आंदोलनादरम्यान त्यांना 9 ऑगस्ट 1942 रोजू मुंबईतून अटक करण्यात आली होती आणि अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले होते. 15 जून 1945 रोजी त्यांची येथून सुटका करण्यात आली.


पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे जनक म्हटले जाते. त्यांनी पंचवर्षीय योजनांचा शुभारंभ केला होता. 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. पंडित नेहरू 1947 ते 27 मे 1964 पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिले. आज आम्ही तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी 10 गोष्टी सांगत आहोत.... 

 


जवाहरलाल नेहरूंच्या आयुष्याशी निगडीत 10 गोष्टी 
 
 
1. पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी अलाहाबाद येथे झाला होता. जवाहरलाल पंडित मोतीलाल नेहरू आणि स्वरूपरानी यांच्या चार मुलांमधील जेष्ठ पुत्र होते. 


2. जवाहरलाल नेहरूंना इंग्लिश, हिंदी आणि संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. नेहरू शिक्षणासाठी 1905 मध्ये ब्रिटनला गेले होते. त्यांनी तेथील कॅम्ब्रिज विद्यापीठातून लॉ चे शिक्षण घेतले. 


3. जवाहरलाल नेहरूंचे 1916 मध्ये कमला नेहरू यांच्यासोबत विवाह केला. लग्नाच्या एका वर्षांनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. इंदिरा प्रियदर्शनी असे मुलीचे नाव होते. 


4. पंडित नेहरू हे लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणारे पहिले व्यक्ती होते. 


5. जवाहरलाल नेहरू सिगारेटचे शौकिन होते. ते प्रत्येक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसायचे. एकदा नेहरू भोपाळला आले होते. तेव्हा तेथे त्यांच्या 555 ब्रँडची सिगारेट संपली होती. भोपाळमध्ये कोठेही त्यांचा सिगारेटचा ब्रँड भेटला नाही. यानंतर एका विशेष विमानाने इंदूनहून सिगारेट मागविण्यात आली होती.  

 

6. जवाहरलाल नेहरूंना एकदा लंडनला जायचे होते. त्यांचा न्हावी नेहमीच उशिरा येत होता. नेहरूंनी त्याच्याकडे विचारणा केली असता तो म्हणाला - माझ्याकडे घड्याळ नाहीये. यामुळे मला नेहमीच उशीर होत असतो. यानंतर नेहरूंनी त्याच्यासाठी लंडनहून नवीन घड्याळ आणली होती. 

 

7. भारतीय महिला सौंदर्य उत्पादनांतर प्रचंड प्रमाणात परकिय चलन खर्च करीत असल्यामुळे पंडित नेहरू चिंतेत होते. त्यांनी जेआरडी टाटांकडे सौंदर्य प्रसाधने निर्माण करण्याचे निवेदन केले. यानंतर लॅक्मे हा सौंदर्य प्रसाधन ब्रँड भारतीय बाजारपेठेत आला. 


8. जवाहरलाल नेहरू एक उत्तम लेखक देखील होते. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' आणि 'ग्लिम्प्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' ही त्यांची नावाजलेली पुस्तके आहेत. 


9. नेहरूंना आपल्या उभ्या आयुष्यात 9 वेळेस तुरूंगवास भोगावा लागला. आपल्या देशसेवेसाठी त्यांना 1955 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


10. 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने नेहरूंचे निधन झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...