आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींच्या निधनानंतर एम्समध्ये हसत होते मोदी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांनी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अटलजी यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित अनेक फोटो आणि बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक मोदींचा फोटोही आहे. फोटोत मोदी हसताना काही डॉक्टर्सबरोबर बोलत असल्याचे दिसतेय. या व्हायरल पोस्टमध्ये लिहिले आहे, माजी पंतप्रधानाच्या मृत्यूमुळे देश दुःखात असताना विद्यमान पंतप्रधान मात्र हसत आहेत. 'आम आदमी जिंदाबाद' नावाच्या फेसबूक पेजवरून शेअर झालेला हा फोटो हजारो लोकांनी शेअर केला आहे. लोक या फोटोमुळे पंतप्रधानांवर टीकाही करत आहेत. चला तर मग जाणून घेऊ फोटोचे सत्य? 


कांग्रेस नेत्यांनी शेअर केली बातमी 
डॉक्टर्सबरोबर उभे असलेल्या मोदींच्या फोटोची बातमी काँग्रेस नेते ब्रजेश कलप्पा यांनी ट्वीट केली होती. त्यांनी लिहिले की, मोदी एम्समध्ये वाजपेयींसाठी अशाप्रकारे दुःख व्यक्त करत आहेत, याचे वाईट वाटतेय. कलप्पा यांच्या ट्वीटनंतर अनेक यूझर्सने त्यांच्यावर टीकाही केली. ब्रजेश यांच्या विरोधात FIR दाखल व्हावी असेही काही म्हणाले. 

 
15 आणि 16 ऑगस्टला एम्समध्ये गेले होते मोदी 
वाजपेयींचे निधन झाले त्यादिवशीही पीएम मोदी असाच पांधरा कुर्ता परिधान करून एम्समध्ये गेलेले होते. तसेच त्यांच्याबरोबरचे गार्डही तेच होते. अटलजींची प्रकृती बिघडल्यानंतर ते 15 आणि 16 ऑगस्टला एम्समध्ये गेले होते. 

 
केरळचा फोटो असल्याचीही अफवा 
गुगलवर हा फोटो सर्च केल्यानंतर आणखी काही ट्वीट समोर आले. त्यात एकाने लिहिले, हा फोटो 10 एप्रिल 2016 चा आहे. मोदी कोल्लम जिल्ह्यातील पारावुर पुत्तिंगल मंदिर अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी गेले होते. पण हा फोटो केरळचाही नसल्याचे समोर आले. कारण त्यादिवशी मोदींनी सिलव्हर कलरचा कुर्ता परिधान केला होचा. 

 
काय आहे सत्य?
हॉस्पिटलच्या मते 16 ऑगस्टला मोदी अटलजींना भेटून दुपारी 2 वाजून 45 मिनटांनी AIIMS मधून गेले होते. एएनआयच्या ट्वीटमध्ये याचा उल्लेख आहे. तर वाजपेयींच्या निधनाची घोषणा सायंकाळी 5.05 मिनिटांनी झाली होती. म्हणजे अटलजींच्या मृत्यूनंतर मोदी हॉस्पिटलमध्ये नव्हते. त्यामुळे फोटोबरोबर केला जाणारा दावा खोटा आहे. 

बातम्या आणखी आहेत...