आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 3 अंकालाच बहुतांश लोक का मानतात Lucky Number?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येकाच्या जीवनात अंकाचे विशेष असे महत्त्व असते. मोबाइल नंबर असो किंवा घराचा, गाडीचा, बँक खात्याच्या अशा अनेक गोष्टींमध्ये अंकाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. प्रत्येकाची अंक निवडीची पद्धत, आवड वेगवेगळी असते. लोक स्वतःच्या शुभ (लकी) अंकाला विशेष महत्त्व देतात.


शास्त्रामध्ये 3 अंकाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. पूजा, आरती आणि इतर कर्मकांडामध्ये प्रत्येक काम तीन-तीन वेळेस केले जाते. कारण मनुष्य जीवनाचे तीन केंद्रबिंदू जन्म, जीवन आणि मृत्यू. या तीन अवस्थांचे तीन देवता क्रमशः ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे आहेत. तीन वेळेस आरती घेणे, तीन प्रदक्षिणा घालणे, तीन वेळेस तीर्थ घेणे हे सर्व कार्य या तीन देवतांसाठी केले जातात.


ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही तीन अंकाचे महत्त्व खूप आहे. सूर्यमालेतील तीन प्रमुख ग्रह आपल्या कुंडलीला सर्वात जास्त प्रभावित करतात. हे तीन ग्रह सूर्य, चंद्र आणि बृहस्पती हे आहेत. सूर्याला पिता आणि आत्मा कारक मानले जाते तर चंद्राला माता आणि मनाचा तसेच बृहस्पतीला ज्ञान आणि आपत्य कारक मानले जाते. यामुळे अनेक ठिकाणी आपण या तीन अंकाला या तिघांचे प्रतिक मानून कर्म करतो.


तीन देव... 1) ब्रह्मा 2) विष्णू आणि  3) महेश हे संपूर्ण सृष्टीचे नियामक मानले जातात. उत्पत्ती, पालन आणि समापन व्यवस्था क्रमश: हे तीन देव संचालित करतात.
 

तीन लोक... 1) स्वर्ग लोक 2) पृथ्वी लोक आणि 3) पाताळ लोक
 

तीन गुण... 1) सत्व 2) रज आणि 3) तम हे संसारातील तीन महत्त्वाचे तत्व. या तत्वांच्या आधारावर सात्विकता, राजसिकता आणि तामासिकतेला परिभाषित केले जाते.


तीन रूप... 1) घन 2) द्रव आणि 3) वायू  यामध्ये विभिन्न पदार्थांच्या तीन मूळ अवस्थांना वर्गीकृत करण्यात आले आहे.
 

तीन रोग... 1) वात 2) पित्त 3) कफ या संदर्भात आयुर्वेदामध्ये सांगण्यात आले आहे की, शरीरात या तीन गोष्टींचे संतुलन बिघडल्यास आरोग्य समस्या निर्माण होतात.


तीन काळ... 1) भूत 2) भविष्य आणि 3) वर्तमान

 

बातम्या आणखी आहेत...