आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या शरीरातील 15 खास शक्ती, ज्याविषयी कदाचित तुम्हाला माहितीच नसेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनुष्य शरीराची रचना अत्यंत जटील म्हणजे गुंतागुंतीची आहे. वैज्ञानिक आजही शरीराच्या विविध गोष्टींचा अभ्यास करत आहेत. आपल्या शरीरात अशा काही अद्भुत शक्ती आहेत ज्याविषयी तुम्हाला माहिती नसेल. उदा. सोमवार आपल्या आयुष्यातील सर्वात धोकादायक दिवस असतो, आपल्या पोटातील हायड्रोक्लोरिक ऍसिड ब्लेडलाही पचवू शकते अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, मनुष्य शरीराच्या आशाच काही रोचक गोष्टी...


शरीरातील व्हेन्स 
आपल्या शरीरातील सर्व व्हेन्स (नसा) आणि कोशिका जोडल्या तर याची लांबी जवळपास 97 हजार किलोमीटर होईल. म्हणजेच एखाद्या मनुष्याच्या शरीरातील सर्व नसा पृथ्वीला अडीच वेळा गुंडाळल्या जाऊ शकतात.


हृदय
मनुष्याचे हृदय दिवसभरातून 1 लाख वेळेस धडकते आणि हृदयाच्या पम्पिंगचे एवढे प्रेशर असते की रक्त 30 मीटर उंच जाऊ शकते. आपल्याला हार्टअटॅकचा सर्वात जास्त धोका सोमवारी आणि सर्वात कमी शनिवारी राहतो.


मेंदू
टेक्सस युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार मनुष्याचा मेंदू 1 पेटा बाईट मेमरी स्टोरेज करू शकतो. मेंदूमधील प्रत्येक सेल्सची स्टोरेज कॅपिसिटी 4.7 बाईट असते. आपला मेंदू पाच वर्षांपर्यत 95 टक्के वाढतो आणि 18 वर्षांपर्यंत 100 टक्के होतो. मनुष्याचा आयक्यू 18 वर्षांपर्यंतच वाढतो, त्यानंतर वाढत नाही. 


हाडे
जन्माच्या वेळी मनुष्याच्या शरीरात 270 हाडे असतात परंतु वयस्क होईपर्यंत काही हाडे जुळतात आणि व्यक्तीच्या शरीरात 206 हाडे राहतात. मनुष्याची हाडे सिमेंटकाँक्रेटपेक्षाही चारपट अधिक कडक असतात. आपल्या शरीरातील सर्वात स्ट्रॉंग आणि लांब हाड हे मांडीतील आहे. मनुष्याची कवटी 29 वेगवेगळ्या हाडांपासून तयार झालेली असते.


प्रेम
प्रेमही मेंदूमध्ये एक्टीव्ह होणाऱ्या केमिकलमुळे होते. प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये डोपामाईन आणि सॅरीटोनिन वाढते.


सेल्स 
मनुष्य शरीरातील सर्वात मोठी सेल्स महिलेचे अंड आणि सर्वात छोटे पुरुषाचे शुक्राणू असते. आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदाला 1 कोटी रेड सेल्स तयारही होतात आणि नष्टही. 


ग्रोथ (विकास)
जन्म घेतल्यानंतर शरीरातील प्रत्येक अवयवाचा विकास होतो परंतु डोळ्यातील बुबुळ आहे तेवढेच राहतात कारण यामध्ये कोणताही रक्तप्रवाह नसतो. सामान्यतः वयस्क होईपर्यंत सर्व अवयव वाढतात परंतु कान आणि नाक मृत्यूपर्यंत वाढत जाते परंतु याची गती फारच मंद असते. आपले अर्धा किलो वजन वाढले तर 11 किलोमीटर लांब व्हेन्स वाढतात. 


इंद्रिय पाचपेक्षा जास्त 
सर्वांना हेच माहिती असावे की, मनुष्याला पाच इंद्रिय आहेत. कान, नाक, डोळे, स्पर्श आणि चव. काही लोक सिक्स सेन्सही मानतात परंतु वैज्ञानिक 9 सेन्स असल्याचा दावा करतात.


मेरुदंड (spinal Cord)
हा फक्त शरीराला आधार देत नाही तर आपल्या मेंदूला पोहोचणाऱ्या सूचना या मेरुदंडाच्या माध्यमातून जातात. कधीकधी क्विक डिसिजनमध्ये मेरुदंड स्वतःच निर्णय घेतो, उदा. आपल्या पायात काटा मोडला तर आपण लगेच पाय वर करतो या सर्व क्रिया मेंदूला नंतर कळतात परंतु मेरुदंड आधीच क्रिया करून टाकतो.


स्किन
आपल्या त्वचेच्या एक इंच भागात जवळपास 3 कोटी बॅक्टेरिया असतात म्हणजे विचार करा संपूर्ण शरीरात किती असतील परंतु यामध्ये घाबरण्यासारखे काहीच नाही कारण यामधील अनेक बॅक्टेरिया फायदेशीर असतात. 


डोळे 
आपले डोळे या सृष्टीवरील जवळपास 1 कोटी रंग ओळखू शकतात. सामान्यतः कॅमेरा 2 ते 42 मेगापिक्सल असतो परंतु डोळ्यातील बुबुळ 576 पिक्सल असतात. 


नाक
मनुष्याचे नाक 50 हजार प्रकारचे गंध ओळखू शकते आणि नकाच फुप्फुसासाठी एअरकंडिशनचे काम करते.


शिंक 
आपण शिकल्यानंतर एक सेकंदासाठी हृदय सोडून संपूर्ण बॉडी काम करणे बंद करते. शिंकताना डोळे बंद होतात आणि नाक-तोंडातून 120 प्रति तास वेगाने हवा बाहेर पडते.


केस
सामान्यतः केसांची लांबी दररोक 0.03 ते 0.05 MM वाढते. एका डोक्यावर जवळपास 1 लाख केस असतात आणि दिवसाला जवळपास 100 गळतात आणि त्याठिकाणी दुसरे केस येतात. दाढीचे केस सर्वात फास्ट वाढतात. एखाद्या पुरुषाने आयुष्यभर दाढी केली नाही तर ती 30 फूट लांब वाढू शकते.


रक्त
एका वयस्क व्यक्तीच्या शरीरात साडेपाच लिटर रक्त असते आणि नसांमधून रक्त 400 तास प्रति किलोमीटर वेगाने वाहते आणि दिवसभर 9500 किलोमीटर अंतर पूर्ण करते. 


उचकी
अमेरिकेतील व्यक्ती चार्ल्स ओसबोर्न या व्यक्तीला 1922 मध्ये उचकी लागली आणि ती 1990 पर्यँत उचकी चालू होती म्हणजेच तब्बल 68 वर्ष. चार्ल्स 96 वर्ष जगले. महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त उचकी लागते.

बातम्या आणखी आहेत...