Home | National | Gujarat | know-the-law

पतीने मनाविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध, म्हणून पत्नी पोहोचली कोर्टात, कोर्टाने दिला हा निर्णय, या गोष्टींकडे लक्ष द्या अन्यथा होऊ शकतो तरुंगवास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 06:01 PM IST

नव-याने मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्यास, पत्नी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला.

 • know-the-law

  यूटिलिटी डेस्कः गुजरात हायकोर्टने काही दिवसांपूर्वी एक निर्णय दिला. नव-याने मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्यास, पत्नी त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही, असा निर्णय हायकोर्टाने दिला.

  गुजरात हायकोर्टाने मॅरिटल रेपप्रकरणी निर्णय देताना म्हटले की, पत्नीचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असल्यास ती पतीवर लग्नानंतर बलात्काराचा आरोप लावू शकत नाही. हा गुन्हा भांदवी कलम 375 अंतर्गत येत नाही. या कलमांतर्गत बलात्काराची व्याख्या वेगळी आहे.

  पण असे करणे गुन्हा आहे...
  न्यायाधिशांनी म्हटले की, एक पत्नी भांदवी कलम 377 अंतर्गत अननॅच्युरल लैंगिक संबंधांसाठी आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल करु शकते. हे प्रकरण भांदवी कलम 377 अंतर्गत एक गुन्हा ठरेल.

  पत्नी संपत्ति नाही...
  न्यायाधिश जेबी परडीवाला यांनी आपला निर्णयात म्हटले की, आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवणे हा अधिकार आहे, पण म्हणून पत्नी त्याची संपत्ती नाही आणि तो तिच्या मनाविरुद्ध असे करु शकत नाही. हायकोर्टाने सांगितले की, मॅरिटल रेपप्रकरणात जगभरात विविध कायदे आहेत आणि या सगळ्यांमध्ये गुन्हा करणा-याला शिक्षा दिली गेली पाहिजे, असे म्हटले आहे. ओरल सेक्स आणि अननॅच्युरल सेक्स क्रूरतेच्या श्रेणीत ठेवले गेले आहे.

Trending