आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशीचे लोक निर्णय घेण्यात करतात घाई, यामुळे सापडतात अडचणीत, जाणून घ्या अशाच 15 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये नावाच्या पहिल्या अक्षराचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये असतो त्या राशीनुसार नावाचे पहिले अक्षर निर्धारित होते. चंद्राच्या स्थितीनुसारच आपली नाम राशी मानली जाते. सर्व 12 राशींसाठी वेगवेगळे अक्षर सांगण्यात आले आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, मेष राशीशी संबंधित काही खास गोष्टी...


मेष
नामाक्षर : चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ
राशीचे स्वरूप - मेंढ्याप्रमाणे
राशी स्वामी - मंगळ


1. राशिचक्रातील सर्वात पहिली रास मेष आहे. या राशीचा स्वामी मंगळ असून धातू संज्ञक ही राशी चर (चलित) स्वभावाची असते. राशीचे प्रतीक मेंढा हा संघर्षाचे प्रतीक आहे.
2. मेष राशीच्या व्यक्ती आकर्षक असून त्यांचा स्वभाव रुक्ष असतो. दिसायला सुंदर. कुणाच्याही दबावाखाली काम करायला आवडत नाही. यांचे चारित्र्य स्वच्छ.पारदर्शी तसेच आदर्श असते.
3. बहुमुखी प्रतिभेचे स्वामी. समाजात यांचे वर्चस्व असून मान.सन्मानाही मिळत असतो.
4. निर्णय घेण्यात घाई करतात तसेच एकदा काम हाती घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय मागे हटत नाहीत.
5. या व्यक्तींचा स्वभाव कधी कधी विरक्तीचाही असतो.


6. मोह या राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात नाही. इतरांची मदत करण्यात आनंद मानतात.
7. कल्पनाशक्ती अगाध असून विचार जास्त करतात.
8. अग्नितत्व असल्यामुळे राग लवकर येतो. कोणतेही आव्हान स्वीकारण्यास तयार असतात.
9. स्वतःचा अपमान लवकर विसरत नाहीत, मनातच दाबून ठेवतात. संधी मिळाल्यानंतर बदला घेण्यास विसरत नाहीत.
10. स्वतःच्या मतावर ठाम राहतात. यांच्यामध्ये एक कलाकार लपलेला असतो.


11. हे लोक प्रत्येक काम करण्यात सक्षम असतात. स्वतःला श्रेष्ठ समजतात.
12. स्वतःच्या मर्जीनुसार इतरांकारून काम करून घेण्यास इच्छुक असतात. यामुळे यांचे अनेक शत्रू निर्माण होतात.
13. एकाच काम दोन-दोनदा करणे या राशीच्या लोकांना आवडत नाही.
14. एकाच ठिकाणी जास्त दिवस राहणेसुद्धा यांना आवडत नाही. नेतृत्व क्षमता उत्तम असते.
15. कमी बोलणे, हट्ट करणे यांचा स्वभाव आहे. कधी-कधी प्रेमसंबंधामध्ये दुःखी होतात.

बातम्या आणखी आहेत...