कार खरेदी करताना / कार खरेदी करताना डीलर्स सांगत नाहीत या 5 गोष्‍टी, तुमच्‍यासाठी जाणुन घेणे आहे आवश्‍यक

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 12:09:00 AM IST

नवी कार खरेदी करणे हा प्रत्‍येकसाठी खास अनूभव असतो. कार खरेदी करताना अशा काही बाबी असतात ज्‍या तुम्‍हाला माहित असणे आवश्‍यक अाहे. कित्‍येकदा डीलर्स या बाबी ग्राहकांपासून लपवून ठेवतात. अशात तुम्‍ही जागरुक असणे महत्‍त्‍वाचे ठरते. विशेषकरुन नवीन कार खरेदी करताना काही गोष्‍टींबद्दल माहिती असायलाच हवी. यामध्‍ये प्री डिलिव्‍हरी इंस्‍पेक्‍शनपासून ते डिस्‍काऊंट पर्यंतचा समावेश आहे.

प्री-डिलिव्‍हरी इन्‍स्‍पेक्‍शन
फेस्‍टीव्‍हल सिझन असताना शोरुममध्‍ये कार खरेदी करण्‍यासाठी प्रचंड गर्दी होत असते. अशावेळी ग्राहक कित्‍येक गोष्‍टी क्रॉसचेक करत नाहीत. ज्‍यामुळे नंतर त्‍यांना नुकसान सहन करावे लागू शकते. त्‍यापैकी एक गोष्‍ट म्‍हणजे प्री-डिलिव्‍हरी इन्‍स्‍पेक्‍शन. कार खरेदी करण्‍यापूर्वी तिची तपासणी केल्‍यास तिच्‍यामध्‍ये काही बिघाड असल्‍यास हे तुम्‍हाला आधीच कळून जाते. त्‍यामुळे नंतर तुमचे नुकसान होत नाही.


फ्री सामान
फ्री कार कव्‍हर व्‍यतिरिक्‍त अशा अनेक वस्‍तू असतात ज्‍याकडे लक्ष देणे महत्‍त्‍वाचे असते. तुम्‍ही डीलरला इंजिन ऑईल आणि कुलेंट लेव्‍हल दाखवण्‍यास सांगितले पाहिजे. लेव्हल कमी असल्‍यास कार खराब होण्‍याची शक्‍यता जास्‍त असते. हे निश्चित करुन घ्‍या की, स्‍पेय व्‍हील पूर्ण क्षमतेने काम करत आहे की नाही. कारसोबत येणारे टुल्‍सही काळजीपूर्वक पाहून घ्‍या. कारसाठी बॅटरी अत्‍यंत महत्‍त्‍वाची असते. ती चांगल्‍या स्थितीत आहे की नाही हे काळजीपूर्वक तपासून घ्‍या. याव्‍यतिरिक्‍त वारंटी कार्डबद्दलही जाणुन घ्‍या.


​डिस्‍काउंट
कार डिलर्सतर्फे जुन्‍या कारवर किंवा नवीन कारमध्‍ये अनेक प्रकारचे डिस्‍काउंट दिले जातात. त्‍यामुळे डीलर कडून हे अवश्‍य जाणुन घ्‍या की, डिस्‍काउंटच्‍या कोणकोणत्‍या ऑफर्स आहेत. याव्‍यतिरिक्‍त व्‍हेइकल आइडेंटिफिकेशन नंबर (VIN) चेक करणे विसरु नका. हा नंबर हे दर्शवितो की कार कोणत्‍या वर्षी मॅन्‍युफॅक्‍चुअर झाली आहे. बहुतेक करुन हा नंबर इंजन-बे मध्‍ये दर्शविलेला असतो.


अॅक्‍सेसरीजलाही चेक करा
नवीन कार अनेक अॅक्‍सेसरीजने सुसज्‍ज असते. अशात तुम्‍ही हे समजण्‍याची चुक करु नका की त्‍या अॅक्‍सेसरीजही चांगल्‍या कंडीशनमध्‍ये असतील. म्‍युझिक सिस्‍टम हे एक महत्‍त्‍वाचे अॅक्‍सेसरीज आहे. त्‍यामुळे त्‍याला लागणारे युएसबी डिव्‍हाईस, ऑक्‍स वायर आणि सीडी प्‍लेअर योग्‍यरीत्‍या काम करते का? हे जाणुन घ्‍या. याव्‍यतिरिक्‍त सेंट्रल लॉक, पार्किंग सेंसर्स आणि कॅमेरासारखे फिचर्सही तपासून घ्‍या.

​पेपरवर्क
कार खरेदी करताना आवश्‍यक ती खबरदारी बाळगली पाहिजे. कधीही घाईत, निष्‍काळजीपणे कार खरेदी करु नये. कागदपत्रे जसे की, रजिस्‍ट्रेशन सर्टिफिकेट (फॉर्म 19), इनव्‍हॉइस नीट तपासून घ्‍या. त्‍यासोबत हेही नीट तपासून घ्‍या की, तुमचे नाव, इंजन नंबर, चेसी नंबर आणि गाडीचा नंबर अचुकरीत्‍या लिहिला गेला आहे. याव्‍यतिरिक्‍त इन्‍श्‍योरन्‍स सर्टिफिकेट, ओरिजनल पीयूसी सर्टिफिकेट, यूजर मॅन्‍युअल आणि बॅटरी, स्‍टीरिओ आणि टायर्ससाठी ओरिजनल वॉरंटी कार्ड्स मांगण्‍यास विसरु नका.

X
COMMENT