आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेपो रेट म्हणजे नेमके काय, यावरून कसे कमी किंवा जास्त होतात सामान्य ग्राहकांचे ईएमआय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - आरबीआयच्या क्रेडिट पॉलिसी दरम्यान रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि सीआरआर अशा स्वरुपाचे शब्द आपण आवश्य ऐकला असाल. याच गोष्टींवर सामान्य ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावरील ईएमआय कमी किंवा जास्त होत असतो. रेपो रेट कमी झाल्यास बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा ईएमआय कमी होतो आणि रेपो रेट वाढल्यास ईएमआय वाढतो. तो नेमका कसा वाढतो आणि कमी होतो. यासोबतच, रिव्हर्स रेपो रेट


रेपो रेट म्हणजे नेमके काय?
त्यामध्ये रेपो रेट एक असा दर असतो ज्यावर बँकांना आरबीआयकडून कर्ज दिला जातो. बँका याच पैशातून ग्राहकांना कर्ज पुरवठा करत असतात. रेपो रेट कमी झाल्यास बँकांना मिळणारे कर्ज स्वस्त होतात. परिणामी सामान्य ग्राहकांना सुद्धा दिलासा मिळतो. बँका रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्यानुसार आपल्या ग्राहकांना सुद्धा कर्ज स्वस्त करून देतात. अर्थातच, गृह कर्ज आणि वाहन कर्जासह इतर कर्जांवरील ईएमआय स्वस्त किंवा महाग होऊ शकतो.


रिव्हर्स रेपो रेट
नावावरूनच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट एकमेकांच्या विरुद्धार्थी असल्याचे स्पष्ट होते. रिव्हर्स रेपो रेटचा अर्थ विविध बँकांचा आरबीआयमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज होय. रिव्हर्स रेपो रेटच्या माध्यमातून आरबीआय बाजारपेठातील कॅश लिक्विडी अर्थात कॅशच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकते. बाजारात खूप रोख रक्कम असल्यास आरबीआय रिव्हर्स रेपोमध्ये वाढ करत असते. जेणेकरून बँका जास्त व्याज मिळवण्यासाठी आपल्याकडील जास्तीत-जास्त रोख रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करतील.


सीआरआर
देशात लागू असलेल्या बँकिंग नियमांनुसार, प्रत्येक बँकेला आपल्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण रकमेपैकी ठराविक रक्कम रिझर्व्ह बँकेकडे जमा करावी लागते. यालाच Cash Reserve Ratio असे म्हटले जाते. त्यावरूनच ठराविक रक्कम निश्चित केली जात असते.


एसएलआर 
SLR चे पूर्ण नाव Statutary Liquidity Rate असे आहे. ज्या दरांवर बँका आपली ठराविक रक्कम सरकारकडे ठेवतात त्यालाच एसएलआर असे म्हटले जाते. बाजारात नकद किंवा रोख रक्कम नियंत्रित ठेवण्यासाठी हा आणखी एक उपाय आहे. कमर्शियल बँकांना एक ठराविक रक्कम यामध्ये जमा करावी लागते. त्याचा वापर आपातकालीन व्यवहारांसाठी केला जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...